शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरुन खून करुन पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 22:30 IST

सुपारी घेऊन केलेल्या खूनाचे पैसे न मिळाल्यामुळे मित्रांनीच डिवचले. त्यामुळे रुपेश पवार (३४) याचाही खून करुन पसार झालेल्या अभिजित जाधव (२९) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने शुक्रवारी अंबरनाथ येथून अटक केली आहे.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाईयापूर्वीही सुपारी घेऊन केला खून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणो: पाच वर्षांपूर्वी सुपारी घेऊन केलेल्या खूनामध्ये पैसे न मिळाल्यामुळे यातून मित्रांनीच डिवचल्यामुळे रुपेश जनार्दन पवार (३४, रा. बदलापूर, पश्चिम) याचाही खून करुन पसार झालेल्या अभिजित जाधव (२९, रा. बदलापूर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने शुक्रवारी अंबरनाथ येथून अटक केली आहे. त्याला बदलापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.अभिजित याने २०१५ मध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा सुपारी घेऊन खून केला होता. सुपारी घेऊनही या खूनाचे त्याला काहीच पैसे मिळाले नव्हते. यावरुनच रुपेश पवार आणि त्याच्या मित्रांनी अभिजितला चिडवून डिवचले होते. याचाच राग आल्याने अभिजितने १२ आॅगस्ट २०२० रोजी रुपेशच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याचा खून केला होता. या खूनानंतर मात्र तो पसार झाला होता. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर येथील शाहूपूरी पोलीस ठाण्यातही २०१३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, बदलापूर आणि कोल्हापूरात त्याच्याविरुद्ध खून, खंडणी, शस्त्र बाळगल्याप्रकरणी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. बदलापूर पूर्व या पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या शाखाप्रमुखाच्या गुन्हयातही त्याला जामीन मिळाला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ अंतर्गत या खून प्रकरणाचा समांतर तपास सुरु होता. अभिजित हा गुजरातच्या वापी येथे असल्याची माहिती पोलीस नाईक दादा पाटील यांना मिळाली. त्याच अनुषंगाने अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार आनंदा भिलारे, दादा पाटील आणि चंद्रकांत वाळूंज आदींनी गुजरातच्या वापी आणि शहरात २७ आॅक्टोबर रोजी शोध घेतला. मात्र, तिथून तो कोल्हापूर येथे मुळ गावी सटकला. मोबाइलही न वापरता तो कोल्हापूरातूनही अंबरनाथ येथे निसटला. अखेर ३० आॅक्टोबर रोजी अंबरनाथ एमआयडीसी भागातून युनिट एकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला शुक्रवारी बदलापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक