शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

म्हारळमध्ये गुन्हेगार वॉच पेट्रोलिंगमध्ये खूनातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग’मध्ये एका खूनातील आरोपी संदीप दत्ताराम ...

ठळक मुद्दे ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईकल्याणच्या म्हारळ गावातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग’मध्ये एका खूनातील आरोपी संदीप दत्ताराम कदम (४०) याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टाही हस्तगत केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दिली.ठाणे ग्रामीणमधील गुन्हयांना आळा बसण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अलिकडेच गुन्हेगार वॉच पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ डिसेंबर २०२० रोजी पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांचे पथक म्हारळ, वरप आणि कांबा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्याच वेळी या परिसरात एक व्यक्ती रिव्हॉल्व्हर बाळगून असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याचआधारे त्या भागात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या संदीप कदम याला या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचा गावठी कट्टा त्याच्याकडून जप्त करण्यात आला. त्याला विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीमध्ये त्याचा चुलत भाऊ संदीप सिताराम कदम (३६, रा. म्हारळगाव, कल्याण) याचा खून राजेश भांडवलकर (३१, रा. साकीनाका, मुंबई) याच्या मदतीने केल्याची कबूली दिली.* सखोल चौकशीमध्ये पूर्व वैमनस्यातून गाडी भाडयाने पाहिजे, असा बहाणा करीत संदीप सिताराम कदम याचे २० डिसेंबर २०२० रोजी त्याच्या मोटारकारसह या आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर त्याला एका अज्ञात ठिकाणी नेऊन देशी बनावटीच्या गावठी कट्टयाने त्याचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तसेच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह सातारा जिल्हयातील मांढरदेवी येथील गडावरील घाटाच्या कटयामध्ये खाली टाकला. ही माहिती मिळाल्यानंतर आरोपीविरुद्ध खून तसेच पुरावा नष्ट करणे तसेच आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, उपनिरीक्षक सुळे, पोलीस हवालदार महाले आदींच्या पथकाने हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणला. या दोन्ही गुन्हयांचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी कदम याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक