शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मातर प्रकरणातील आरोपीला आलिबाग येथून अटक

By कुमार बडदे | Updated: June 11, 2023 21:04 IST

आरोपीचे प्राप्त लोकेशनच्या आधारे तेथील लॉज कॉटेजची रात्री ते सकाळी ११ वाजे पर्यंत तपासणी केली असता तो  एका कॉटेज मध्ये आढळून आला.

मुंब्राः ऑनलाईन गेमच्या आड कथित धर्मातर केलेला आरोपी ,बद्दो उर्फ शाहनवाज मकसुद खान (वय २३)  याला मुंब्रा पोलिसांनी रविवारी आलिबाग येथून अटक केली. त्याच्या विरोधात कविनगर पोलिस ठाणे गाझियाबाद येथे धर्मांतर कायदा कलम ३,५(१ ) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा तपास करत असलेले  सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय कुंभार आणि त्यांच्या पथकाला मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्य आधारे तो वरळी पोलिस ठाणे हद्दीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे  वरळी पोलीस यांचे मदतीने त्याचा शोध घेतला आसता तो आलिबाग येथे पळून गेल्याची माहिती  पोलिसांना मिळाली.  लागलीच पोलिस पथक परस्पर अलिबाग येथे गेले.

आरोपीचे प्राप्त लोकेशनच्या आधारे तेथील लॉज कॉटेजची रात्री ते सकाळी ११ वाजे पर्यंत तपासणी केली असता तो  एका कॉटेज मध्ये आढळून आला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन संध्याकाळी मुंब्रा पोलिस ठाण्यात आणले..आरोपी शाहनवाज याचे कडे कविनगर पोलिस ठाणे गाझियाबाद चे अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी व पीडित मुलगा यांची २०२१  च्या सुरवातीस Fort Nite या गेमिंग ॲप्लिकेशन वरून ओळख झाली गेम खेळणाऱ्या लोंकाना एकमेकांशी बोलण्यासाठी discod सुविधा च्यां मार्फतीने ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन त्यांनीं एकमेकांचे फोन नंबर घेऊन बोलण्यास सुरवात केली. त्यानंतर काही दिवसांनी गेम खेळणे बंद केले  २०२१  च्या डिसेंबर अखेर valorant गेम खेळण्यास सूरवात केली.Valorant गेम खेळत असताना Ice - Box या टार्गेट च्या ठिकाणीं पोचले असता दोघांमध्ये पहिल्यांदा धर्मांतर विषयावर बोलणे झाले व झाकीर नाईक यानी केलेल्या स्पीच वर चर्चा झाली.आरोपी हा त्याचे राहते घरी असलेल्या कम्प्युटर वरून गेम खेळत होता त्याचे जवळ एक One Plus मोबाईल आहे.आरोपीचे घरी एक I- Pad, कॉम्पुटर आहे. आरोपी चा व्हॉट्स ॲप नंबर असुन ,त्याच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट असून,याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.