शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात गांजाची तस्करी करणाऱ्या पुजारी टोळीच्या तस्कराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:53 IST

मुंबईत खंडणीचे चार गुन्हे दाखल असलेल्या गँगस्टर पुजारी टोळीतील रोहिदास घाडगे याला गांजाची तस्करी करतांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देअडीच लाखांचा गांजा हस्तगतठाणे गुन्हे शाखेची कारवाईविठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : उल्हासनगर-विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या रोहिदास घाडगे (४६, चिंचपाडा, कल्याण, पूर्व) या रवी पुजारी टोळीच्या तस्कराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ५५ हजारांचा साडेआठ किलोचा गांजा हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार आणि सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांचे पथक कल्याणच्या चिंचपाडा परिसरात गस्त घालत असताना त्याच परिसरात रोहिदास हा गांजा विक्री करत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि अपर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने १३ मार्च रोजी सापळा रचून त्याला अटक केली. कल्याण, उल्हासनगर परिसरात विक्रीसाठी आणलेला साडेआठ किलो वजनाचा गांजाही त्याच्याकडून या पथकाने हस्तगत केला. त्याच्याविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.* घाडगेविरुद्ध खंडणीचेही गुन्हेरोहिदास घाडगे हा गँगस्टर रवी पुजारी टोळीशी संबंधित असून त्याच्याविरुद्ध मुंबईत यापूर्वी खंडणीचेही चार गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्कांतर्गतही कारवाई केली होती. यात तो पाच वर्षे कारागृहात होता. अलीकडेच तो कारागृहातून सुटला होता. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्याची खबर ठाणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर, त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी