शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

खूनाचा प्रयत्न करून मुंबईतून पसार आरोपीस ठाण्याच्या डायघर येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 01:21 IST

खूनाच्या प्रयत्नासह १६ गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची नोंद, दोन वेळा तडीपार तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाई करुनही मुंबईतून पसार झालेल्या गुंडाला डायघर भागातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाईदोन वेळा तडीपार, १६ गंभीर गुन्हयांची नोंदवरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उसनवारीने घेतलेले पैसे मागितल्याने सलीम शाहू (३०) याच्यावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या अब्दूल शेख (३५, रा. गोवंडी, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी डायघर भागातून ताब्यात घेतले. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे नोंद असून त्याला दोन वेळा मुंबईतून तडीपार करण्यात आले होते.मुंबईतील गोवंडी येथे सलीम आणि अब्दूल यांच्यात पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद झाला होता. यातूनच उसनवारीने घेतलेले पैसे सलीमने मागितल्यामुळे त्याच्यावर मार्च २०२० मध्ये शेख याने तलवाीने वार करुन तो पसार झाला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध देवनार पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. अब्दुल शेख उर्फ शंभो हा शीळ डायघर भागात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे १० नोव्हेंबर रोजी त्याला सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी आणि घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, प्रशांत पवार, भूषण शिंदे जमादार शरद तावडे, पोलीस हवालदार जगदीश न्हावळदे, राजेश क्षत्रिय आणि शिवाजी रायसिंग आदींच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. नंतर त्याला देवनार पोलिसांनी अटक केली.* अब्दूल शेख याच्यावर खूनाचा प्रयत्न आणि हाणामारीसह १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे मुंबई तसेच नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याला दोन वेळा मुंबईतून तडीपारही केले होते. तसेच त्याच्याविरुद्ध महाराष्टÑ झोपडपट्टी दादा (एमपीडीए) अंतर्गतही कारवाई करण्यात आलेली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक