शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे ठाण्यातून अपहरण करणारे भिवंडीत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:00 IST

तीन लाखांची खंडणी उकळण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटूंबातील दहा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या कल्पनाथ आणि सिकंदर चौहान या दोन्ही भावांना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून या मुलाचीही सुखरुप सुटका केल्याने आई वडीलांनी पोलिसांचे आभार मानले.

ठळक मुद्देमुलाची ठाणे पोलिसांनी केली सुटका वागळे इस्टेट आणि श्रीनगर पोलिसांची कामगिरी आई वडीलांनी मानले पोलिसांचे आभार

ठाणे: तीन लाखांच्या खंडणीसाठी सिनेस्टाईल दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणा-या कल्पनाथ चौहान (५३) आणि त्याचा साथीदार भाऊ सिकंदर चौहान (४८, रा. एकतानगर, नारपोली, भिवंडी) या दोघांनाही वागळे इस्टेट आणि श्रीनगर पोलिसांच्या पथकांनी मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. त्याच्या तावडीतून खंडणीतील तीन लाखांची रोकडसह या मुलाचीही सुखरुप सुटका करण्यात आली आहे.वागळे इस्टेट भागात राहणारे योगेंद्रकुमार आणि मनिता जैस्वार यांचा मुलगा क्रिश (वय १० वर्ष पाच महिने) याचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी १३ जानेवारी २०१९ रोजी दाखल केली होती. या मुलाच्या सुटकेसाठी तीन लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी चिठ्ठी आणि फोनद्वारे केल्याची माहितीही वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अंबुरे यांना १७ जानेवारी रोजी मिळाली. तीन लाखांच्या खंडणीची रक्कम जैस्वार यांच्या घराजवळ राहणारा टीव्ही दुरुस्त करणारा कल्पनाथ चौहान याच्यामार्फतीने दादर रेल्वे स्थानक येथे पाठवून द्यावी, असेही एका चिठ्ठीद्वारे सांगण्यात आले होते. पण, याबाबत पोलिसांसह कुठेही वाच्यता केल्यास परिणाम वाईट होतील, असेही संबंधित खंडणीसाठी फोन करणा-याने योगेंद्रकुमार जैस्वार यांना बजावले होते. ही माहिती मिळताच अंबुरे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण आणि श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार वेगवेगळी पथके तयार केली. तीन लाखांची रक्कम नेतांना कल्पनाथ चौहान हा एकटा दादर रेल्वे स्थानक येथे येईल. त्याठिकाणी आल्यावर तो फोन करेल त्यानंतर एका कारमध्ये ही रक्कम चौहान कारमधील व्यक्तीच्या ताब्यात देईल, त्यानंतर कार पुण्याला गेल्यानंतर मुलाची सुटका केली जाईल, असेही अपहरण कर्त्यांनी जैस्वार यांना बजावले होते. सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पठाण, पाटील आणि सुनिल पंधरकर पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गोसावी, अनिकेत पोटे तसेच स्थानिक नागरिक हैदर खान, मोहम्मद सय्यद, इम्रान शेख, इस्तीयान शेख आणि सलमान यांच्यासह दहा ते १५ जणांच्या पथकाने साध्या वेशातून काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने सापळा लावला. त्यानुसार जैस्वार यांच्या घराजवळ, इंदिरानगर नाका, वागळे इस्टेट आदी ठिकाणी पोलीस कर्मचा-यांना नेमण्यात आले. ठरल्याप्रमाणे योगेंद्रकुमार हे स्वत:कडील आणि काही कर्जाऊ रक्कम अशी तीन लाखांची रोकड घेऊन कल्पनाथ याच्याकडे दिली. त्यावेळी सापळयातील पोलिसांनी एकमेकांशी संपर्क साधून त्याच्यावर पाळत ठेवली. काहींनी रिक्षा, जीप आणि मोटारसायकलद्वारे त्याच्या नकळत त्याचा पाठलाग केला. त्याने दादरला जाण्याऐवजी रिक्षाने माजीवडा मार्गे भिवंडीतील अंजूरफाटा येथे पोहचला. जैस्वार यांना मात्र त्याने आपण मीरा रोडला पोहचल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो भिवंडीच्या अंजूरफाटा येथे असल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. तो नारपोली, एकतानगर येथील एका घरात शिरल्यानंतर त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या तावडीतून क्रिशची सुखरुप सुटकाही केली आणि तीन लाखांची रोकडही हस्तगत करण्यात आली. यामध्ये कल्पनाथ हाच सूत्रधार असल्याचेही स्पष्ट झाले. या दोघांनाही गुरुवारी रात्री १०.३० वा. च्या सुमारास अटक करण्यात आली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण