शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑासह अनेक राज्यांमधील सराफांना गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:14 IST

बोलण्यात गुंतवून महाराष्टÑासह अनेक राज्यातील सराफांना हातचलाखीद्वारे गंडा घालणा-या गुलाब शेख आणि घनश्याम राजपुत या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देूबोलण्यात गुंतवून लक्ष वेधायचेठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी सोन्याचे दागिने आणि हिरेही हस्तगत

ठाणे: महाराष्टÑासह दिल्ली, राजस्थान तसेच उत्तरप्रदेशातील सराफांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने लुबाडणा-या गुलाब अब्बास शेख (४५) आणि घनश्याम राजपुत (२७) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजार ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १० ग्रॅमचे हिरे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.सराफाच्या दुकानदारांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि हिरे लुबाडणारी एक आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे घाटकोपर येथील पंखेशा बाब दर्ग्याच्या मागे सापळा रचून एसआरए बिल्डींग मधील १००३ आणि १३०४ या सदनिकांमध्ये छापा टाकून गुलाब आणि घनश्याम या दोघांना १९ जानेवारी रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीच्या कालावधीत या दोघांनी लुटीसाठी वापरलेली ६० हजारांची केटीएम मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. तमसेच त्यांनी दिल्ली, राज्यस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्टÑासह अनेक राज्यांमध्ये दहा अशा प्रकारचे गुन्हे करुन दोन हजार ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ९.७५ ग्रॅम वजनाचे हिरे चोरल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून आणखीही अशा प्रकारचे गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे, संदीप बागूल, समीर अहिरराव आदींचे पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक