शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:00 IST

आईस्क्रीमचे आमिष दाखवून भांडुप येथील एका बालिकेवर शनिवारी लैंगिक अत्याचार करणाºया आरोपीस ठाण्याच्या पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली. आरोपीला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे : आईस्क्रीमचे आमिष दाखवून भांडुप येथील एका बालिकेवर शनिवारी लैंगिक अत्याचार करणाºया आरोपीस ठाण्याच्या पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली. आरोपीला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ब्रह्मांडमधील आझादनगर मार्गावर एक पाच वर्षाची मुलगी रडत उभी होती. तेथून मोटारसायकलने जात असताना ठाण्यातील रहिवासी प्रवीण मकवाना यांना ही मुलगी दिसली. त्यांनी विचारपूस केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. मकवाना यांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलगी पोलिसांना तिचा पत्ता किंवा अन्य कोणताही तपशील सांगू शकली नाही. कोणताही पुरावा नसल्याने तिच्या आईवडिलांचा आणि आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी कठीण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळ परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये आरोपीचा चेहरा दिसला. आरोपीविषयी ठिकठिकाणाहून माहिती घेण्याचे काम सुरू असताना एका रिक्षाचालकाकडून पोलिसांना ठोस माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुमन नंदकुमार झा (३८) याला अटक केली.पीडित मुलगी भांडुप येथे घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला आईसक्रिमचे आमिष दाखवून कडेवर घेतले. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर आॅटोरिक्षाने तो ठाण्यातील माजिवड्यापर्यंत आला. त्यावेळी रिक्षाचालकास त्याच्यावर संशय आला. त्याने आरोपीला विचारणा केली असता, बहिणीची मुलगी असून, तिला घरी सोडण्यासाठी जात असल्याचे आरोपीने सांगितले. माजिवडा येथे उतरल्यानंतर दुसºया रिक्षाने तो आझादनगरकडे गेला. तेथील निर्जन झुडपामध्ये अत्याचार केल्यानंतर आरोपीने मुलीला तिथेच सोडले. मुलीचे आईवडील तिच्या शोधात शनिवारी रात्री भांडुप पोलिसांकडे पोहोचले. ठाणे पोलिसांनी याचा अंदाज घेऊन मुलीची माहिती आधीच भांडुप पोलिसांना दिली होती. भांडुप पोलिसांकडून मुलीच्या आईवडिलांची माहिती मिळताच पीडित मुलीला त्यांच्या हवाली करण्यात आले.>आरोपीच्या अटकेसाठी चार पथकेआरोपी बेरोजगार असून, तो आधी सुरक्षारक्षकाची नोकरी करायचा, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याची पत्नी लोकांकडे घरकाम करते. आरोपीला १२ वर्षाची एक मुलगी असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके गठित करण्यात आली होती. कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर, पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, सहायक पोलीस निरीक्षक कैलाश टोकले, सुजित खरात, व्ही.एच. दुर्वे, वसंत पाटील यांनी आरोपीला अटक केली.