शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या नायजेरियनसह दोघांना मुंब्य्रातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:31 IST

मुंब्रा येथील चुहा ब्रिजजवळ क्रि स्टल मेफेड्रॉन अर्थात एमडी पावडर या अमली पदार्थाची तस्करी करणाºया रोहित रवींद्र सावंत आणि त्याचा नायजेरियन साथीदार पॅट्रिक अगांचू या दोघांना मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून १० ग्रॅम क्रि स्टल एमडी पावडरही जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मुंब्रा पोलिसांची कारवाई१० ग्रॅम क्रिस्टल एमडी पावडर हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंब्रा येथील चुहा ब्रिजजवळ क्रि स्टल मेफेड्रॉन अर्थात एमडी पावडर या अमली पदार्थाची तस्करी करणा-या रोहित रवींद्र सावंत (२६, रा. दिवा पूर्व, ठाणे) आणि त्याचा नायजेरियन साथीदार पॅट्रिक अगांचू (३६, रा. नालासोपारा) अशा दोघांना मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून १० ग्रॅम क्रि स्टल एमडी पावडरही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.जुन्या मुंबई-पुणे महामार्गाजवळील चुहा ब्रिज परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय किरपण, योगेश पाटील, छोटू दाभाडे आणि सुदीप हुलवान यांच्या पथकाने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून एमडी पावडरसह रोहित सावंत याला अटक केली. त्याच्याकडून २८ हजार रुपये किमतीची एमडी पावडर आणि एक हजार २५० रुपये इतकी रोकड असा २९ हजार २५० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे त्याने ज्याच्याकडून ही एमडी पावडर खरेदी केली, त्या नायजेरियन पॅट्रिक या तस्करालाही १२ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास या पथकाने अटक केली. या दोघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८-क, २२-ब आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ