शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाच्या मुलाच्या खूनप्रकरणी आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 23:59 IST

नगरसेवकपुत्राचा खून : सोन्याचे दागिने, रिव्हॉल्व्हर हस्तगत

ठाणे : संपत्तीच्या वादातून ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची हत्या करून पसार झालेला त्याचा सावत्र भाऊ सचिन सर्जेराव पाटील (२६, रा. ठाणे) याला अखेर अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून तीन किलो ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने, गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमालही जप्त केला आहे. या खुनात मदतीसाठी त्याने चालक गौरव सिंग याला दोन लाख रुपये देण्याचीही आॅफर दिली होती.

पाटील यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राकेश पाटील (३५) हा स्कूटरसह बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी कविताने २० सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेले राकेशचे वडील माणिक हे २० सप्टेंबर रोजी त्यांच्या तिसऱ्या पत्नीसह घरी परतले. त्यावेळी घरातील तिजोरी फोडल्याचे त्यांना आढळले. राकेशनेच ही चोरी केल्याच्या संशयातून त्यांनी तशी तक्रारही दाखल केली.राकेश आणि चोरीस गेलेल्या सोन्याचा समांतर तपास वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. दरम्यान, राकेशची स्कूटर माणिक यांचा चालक तसेच सावत्र मुलगा सचिन (माणिक यांच्या तिसºया पत्नीच्या पहिल्या पतीचा मुलगा) याचा साथीदार गौरव सिंह (२७) याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने २३ सप्टेंबरला रात्री गौरवला अटक केली.मात्र, त्यानंतर पसार झालेल्या सचिन याचा जाधव, उपनिरीक्षक रूपाली रत्ने व कुलदीप मोरे या तीन पथकांमार्फत शोध घेण्यात येत होता. त्याने फोनही वापरणे बंद केले होते. अखेर, उलवे येथे तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर २६ सप्टेंबरला पोलिसांनी त्याला अटक केली. गौरवच्या मदतीनेच संपत्तीच्या वादातून राकेशचा खून केल्याची कबुलीही सचिनने दिली. या खुनाच्या मदतीसाठी गौरवला दोन लाख रुपये देण्याचेही ठरले होते. सचिनला ४ आॅक्टोबरपर्यंत तर गौरवला १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.राके शच्या कपाळावर झाडली गोळीच्आरोपी गौरव सिंह याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानुसार, राकेशचा सावत्र भाऊ सचिनसह कट रचून २० सप्टेंबर रोजी राकेशला दारू पाजून घरी झोपवले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सचिन याने त्याच्या पिस्तूलमधून राकेशच्या कपाळावर गोळी झाडून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह चादर आणि सोफ्याच्या क व्हरमध्ये गुंडाळून तो वाशी खाडीपुलावरून पाण्यात फेकल्याची कबुली गौरवने दिली.च्त्यानुसार, याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सचिन आणि गौरवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राकेशच्या मृतदेहाचा वाशी खाडीत अग्निशमन दल आणि रहिवाशांच्या मदतीने अजूनही शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी