शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टीनचे कंत्राट मिळविण्याचे अमिष दाखवून ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 19:40 IST

उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे अमिष दाखवून जगदीप दुबे (३८, रा. ब्रम्हांड, ठाणे) यांची ३२ लाखांची फसवणूक करणाºया रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा (५१, रा. माजीवडा, ठाणे) याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला १६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देखंडणी विरोधी पथकाची कारवाई अन्य एका गुन्हयात मिळविला अंतरिम जामीन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे अमिष दाखवून जगदीप दुबे (३८, रा. ब्रम्हांड, ठाणे) यांची ३२ लाखांची फसवणूक करणाºया रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा (५१, रा. माजीवडा, ठाणे) याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.रोहित याने त्याचे साथीदार भगवान पवार (३६), पल्लवी पवार (३६), विठाबाई पवार (५५) आणि विनोद शेट्टी (३९) यांच्या मदतीने दुबे यांना अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून जानेवारी २०१६ ते ११ डिसेंबर २०२० या काळात त्याने ३२ लाख रुपये घेतले. त्यानंतर दुबे यांच्या नावाने उपहारगृहाचे कंत्राट मंजूर झाल्याचा बनावट कार्यादेश त्यांना दाखविला. प्रत्यक्षात कोणतेही कंत्राट मिळवून न देता त्यांच्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी तक्रार दाखल होती. दरम्यान, रोहित हा ठाण्यातील गोल्डन डाईज नाका येथे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे १२ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय भिवणकर, पोलीस नाईक प्रशांत बुरके, संदीप भांगरे, महेश साबळे आणि रोशन जाधव आदींच्या पथकाने त्याला २४ तासांमध्ये ताब्यात घेतले. त्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून ठाणे न्यायालयाने त्याला १६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.* दरम्यान, मार्च २०२० मध्ये कासारवडवली येथील एका बारमध्ये झालेल्या हाणामारीच्या गुन्हयातही तो वॉन्टेड होता. यामध्ये त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. रोहित हा अकबर पाशा या दुसºया नावानेही मिरवत होता.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक