शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
3
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
4
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
5
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
6
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
7
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
9
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
10
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
11
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
12
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
13
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
14
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
15
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
16
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
17
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
18
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
19
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
20
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश

ठाण्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:04 PM

ठाण्यातील रुपादेवी पाडा क्रमांक दोन येथील एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या सागर सुरेश देठे (२४) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने कर्जत (जि. रायगड) येथून नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शोध पथकाने केली कारवाईकर्जत येथून आरोपीला घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेट रुपादेवी पाडा क्रमांक दोन येथील एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या सागर सुरेश देठे (२४, रा. शिवनेरी चाळ,इंदिरानगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने कर्जत (जि. रायगड) येथून शनिवारी अटक केली आहे. त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.रुपादेवी पाडा क्रमांक दोन परिसरात राहणारी ही पिडित मुलगी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती संपूर्ण दिवसभरात घरी न परतल्यामुळे तिच्या अपहरणाची तक्रार तिच्या पालकांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तिचा श्रीनगर पोलिसांंबरोबरच गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांचे पथकही शोध घेत होते. रुपादेवी पाडयातील सागर याने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची माहिती होनराव यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कर्जत येथून अटक केली. तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचेही तपासात उघड झाले. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असून श्रीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. डी. कोपरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार