शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डबिंग आर्टिस्टच्या खून प्रकरणातून आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:52 IST

डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या मीरा रोड येथील एका महिलेच्या खून प्रकरणातून न्यायालयाने एका चालकाची निर्दोष सुटका केली. जानेवारी २०१३मध्ये ही घटना घडली होती.

ठाणे - डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या मीरा रोड येथील एका महिलेच्या खून प्रकरणातून न्यायालयाने एका चालकाची निर्दोष सुटका केली. जानेवारी २०१३मध्ये ही घटना घडली होती.सीमा मॅसन यांचा मृतदेह २ जानेवारी २०१३ रोजी त्यांच्या मीरा रोड येथील फ्लॅटमध्ये आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये सीमा यांच्या पतीच्या कंपनीमध्ये चालक म्हणून कामाला असलेल्या सोनू सिंग यांना अटक करण्यात आली होती. सोनू सिंग हे सीमा मॅसन यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाºया त्यांच्या बहिणीकडे वास्तव्यास होते. आरोपीचे सीमा मॅसन यांच्याशी जवळचे संबंध होते.सीमा मॅसन यांचे पती रूपेश यांच्याकडून या संबंधांबात आक्षेपही नोंदवण्यात आला होता. घटनेच्या दिवशी सीमा प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच होत्या. रूपेश यांनी आरोपीशी संपर्क साधून पत्नीची विचारपूस करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोपी सीमा यांच्या घरी गेला असता दरवाजा आतून बंद होता. बेल वाजवूनही कुणीच दरवाजा न उघडल्याने आरोपीने ही बाब रूपेश यांना फोन करून सांगितली. त्यानंतर रूपेश घरी आले. दरवाजा तोडला असता त्यांना पत्नी मृतावस्थेत आढळली.याप्रकरणी रूपेश यांनी केलेल्या तक्रारीनुसार काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाअंती सोनू सिंग याला अटक करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सीमा मॅसन यांच्या मोबाइलच्या कॉल्सचा तपशील न्यायालयासमोर आला.न्यायालयाने तो तपासला असता घटनेच्या जवळपास दोन महिने आधीपासून मृतक आणि आरोपी एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, आरोपी या खून प्रकरणात सहभागी असल्याचा कोणताही ठोस पुरावा सरकारी पक्ष न्यायालयासमोर सादर करू शकला नाही. शिवाय इतर पुरावेही सबळ नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे केवळ संशयावरून एखाद्याला खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी ठरवता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणेnewsबातम्या