शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

महिलेवर ज्वलनशील द्रव्य टाकणाऱ्या आरोपीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 04:19 IST

मीरा रोड : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या पीडितेच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकणाऱ्या आरोपीस ठाणे न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ...

मीरा रोड : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या पीडितेच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकणाऱ्या आरोपीस ठाणे न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डिसेंबरमध्ये या आरोपीच्या अन्य एका साथीदाराने पीडितेच्या अल्पवयीन भाचीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला आधी अटक केली होती.

२६ वर्षीय पीडित महिला स्वत:च्या दोन व बहिणीच्या दोन अशा चार मुलांना सोबत घेऊन काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहते. मीरा रोडच्या नयानगरमध्ये राहणारा आरोपी इशरत अली ऊर्फ सोनू (३२) याने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा १९ जानेवारी रोजी काशिमीरा पोलिसांनी दाखल केला होता. तेव्हापासून फरार असलेला सोनू गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेस धमकावत होता.

गेल्या शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही महिला हाटकेश-घोडबंदर रोडने घरी जात असताना सोनू व त्याच्या साथीदाराने तिच्यावर रॉकेल किंवा पेट्रोलसारखे ज्वालाग्राही द्रव्य ओतले. शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री सोनूला अहमदाबाद येथून अटक केली.ठाणे न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. घटनेच्यावेळी सोनूसोबत असलेल्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती हा नयानगर, एनजी प्लाझामधील सोनूच्या हॉटेलात नोकरीला होता. त्यामुळे त्यांचा परिचय होता. नवºयाने तलाक दिल्यावर महिलेस लग्न करण्याचे आश्वासन देऊन सोनू तिच्यासोबत राहायचा. तिच्याकडे सोनूसोबत येणाºया तौसिफ शेख (रा. भारती पार्क, मीरा रोड) याने महिलेच्या तेरावर्षीय अल्पवयीन भाचीसोबत बळजबरीचा प्रयत्न केला होता.त्यावेळी पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखल करून तौसिफला २३ डिसेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. १ फेब्रुवारी रोजी त्याची जामिनावर सुटका झाली. वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सोनूच्या पत्नी आणि महिलेचा वाद

सोनूने महिलेस लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले. सदर बाब सोनूच्या पत्नीला समजल्यावर दोघींमध्ये वाद झाला. दोघींनी एकमेकींविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारीही केल्या होत्या. महिलेच्या फिर्यादीवरून काशिमीरा पोलिसांनी १९ जानेवारी रोजी सोनूविरोधात बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसthaneठाणे