शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मिरीटनुसार ठाणे लोकसभा भाजपाला द्या, २३ नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:51 IST

ठाणे - एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये युती झाली असली तरी अनेक ठिकाणी या युतीच्या विरोधात आतापासूनच खटके उडू ...

ठळक मुद्देभाजपाने पुकारला शिवसेनेच्या विरोधात असहकारकळवा, मुंब्य्रातही श्रीकांत शिंदेंना धोक्याची घंटा

ठाणे - एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये युती झाली असली तरी अनेक ठिकाणी या युतीच्या विरोधात आतापासूनच खटके उडू लागले आहेत. ठाण्यातील भाजपाच्या २३ नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून मिरीटीनुसार ही जागा भाजपाला द्यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दाबे चांगलेलच दणाणले आहेत. ही जागा भाजपाला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नसल्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.                          राज्यात सध्या युतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे युती धर्म पाळण्यासाठी मागील साडेचार वर्षे एकमेकांच्या विरोधात बोलणारी मंडळी आता एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु भिवंडीत तर शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराने भाजपाच्या विरोधात असहकार पुकारला आहे. त्यानंतर आता ठाणेलोकसभा मतदार संघातही शिवसेनेच्या मनात धडकी भरण्याची कामे भाजपाच्या नगरसेवकांनी केले आहे. ठाणे लोकसभेची जागा ही मिरीट नुसार भाजपालाच द्यावी अशी थेट मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे विधानसभेत नंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता, संजय केळकर तर निरंजन डावखरे आणि रमेश पाटील हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. परंतु शिवसेनेचे मात्र विधानसभेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आणि रविंद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे या संख्याबळाचा विचार केल्यास मिरीटनुसार भाजपाच आघाडीवर आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला सोडावी अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.दुसरीकडे मागील साडेचार वर्षात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार आणि नगरसेवकांच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच लोकांशी उध्दटपणे वागणे यामुळे ठाणेकरसुध्दा त्यांच्यावर नाराज आहेत. या संदर्भात आपल्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यातही ही जागा शिवसेनेला देणे अपरिहार्य झाले तरी सुध्दा राजन विचारे यांच्या ऐवजी दुसरे कोणतेही नाव द्यावे त्यांच्यासाठी आम्ही काम करु मात्र विचारेंचे काम करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्व नगरसेवकांची जी मागणी आहे, त्यानुसार हा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे श्रेष्ठी याची दखल घेतील अशी अपेक्षा आहे.(नारायण पवार - गटनेते, भाजपा)

श्रीकांत शिंदेच्या विरोधातही कळवा, मुंब्य्रात असहकारयुती झाली असली तरीसुध्दा मागील साडेचार वर्षात श्रीकांत शिंदे यांनी कळवा, मुंब्य्राकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही काम का करायचे असा सवाल कळवा, मुंब्य्रातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेlok sabhaलोकसभाBJPभाजपा