शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Accident: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टेम्पो पलटला

By अजित मांडके | Updated: November 22, 2022 11:41 IST

Accident: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील नितीन कंपनी ब्रिजजवळ ३ टन प्लास्टिक मटेरियल घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ही घटना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडली.

- अजित मांडके ठाणे : ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील नितीन कंपनी ब्रिजजवळ ३ टन प्लास्टिक मटेरियल घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ही घटना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडली. या घटनेमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वाहतूक कोंडी झाली होती. तो रस्ता टेम्पो रस्त्याच्या बाजूला केल्यावर सर्व वाहनांसाठी मोकळा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

मयूर अभंग यांच्या मालकीच्या टेम्पोमध्ये ३ टन प्लास्टिक मटेरियल घेऊन भिवंडीतुन गोरेगांव येथे त्यांचा चालक बालाजी मंदे हे निघाले होते. ते टेम्पो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर आल्यावर त्यांचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो नितीन कंपनी ब्रिजजवळ उलटला. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती मिळताच, घटनास्थळी शहर वाहतूक विभागाचे पोलीस व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी तातडीने कोंडी सोडविण्यासाठी उलटलेला टेम्पो रोडच्या बाजुला करण्याचे काम सुरु केले. अखेर १ हायड्रा मशीनच्या साह्याने तो टेम्पो रस्त्याच्या बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्व वाहनांसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे