शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Accident: ठाण्यात भरधाव कारने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली

By अजित मांडके | Updated: November 22, 2022 11:19 IST

Thane: विमानतळ येथून माजीवडा येथे प्रवासी घेऊन आलेल्या एका चारचाकी कारला ठाण्यातील गोकुळ नगर येथे मंगळवारी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली.

- अजित मांडकेठाणे : विमानतळ येथून माजीवडा येथे प्रवासी घेऊन आलेल्या एका चारचाकी कारला ठाण्यातील गोकुळ नगर येथे मंगळवारी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली. या धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने त्या आगीची धग रस्त्यावर उभ्या केलेल्या दोन रिक्षांना बसली असून ती तिन्ही वाहने जळुन खाक झाली आहे. या घटनेमुळे त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

कार चालक शामलाल गुप्ता हे ओला कॅबने मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळ तेथून प्रवासी भाडे घेऊन ठाण्यातील माजिवाडा येथे एक प्रवास घेत दाखल झाले. ते गोकूळ नगर येथे आल्यावर अचानक त्यांच्या कारने पेट घेतला. या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. त्यामुळे ज्या रस्त्या कार उभी केली त्याच्या शेजारी पार्क असलेल्या २ रिक्षांनाही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी राबोडी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तेंव्हा कुठे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. जवळपास सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

ही आग शहरात जाणाऱ्या रस्त्यावर लागल्याने त्याचा फटका सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या  विद्यार्थ्यांसह कामधंद्याला बाहेर पडलेल्या नागरिकांना कळत नकळत बसला. तसेच यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. झालेली कोंडी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्यानंतर काही मिनिटांनी सुटल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात