शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्यांचा ठराव घाईत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:45 IST

महापालिकेत काँग्रेस-सेना सत्तास्थापनेचे वर्ष उलटल्यानंतर गुरूवारी झालेल्या महासभेत घाईघाईत पाच नामनिर्देश सदस्यांसाठी ठराव झाला.

भिवंडी : महापालिकेत काँग्रेस-सेना सत्तास्थापनेचे वर्ष उलटल्यानंतर गुरूवारी झालेल्या महासभेत घाईघाईत पाच नामनिर्देश सदस्यांसाठी ठराव झाला. सरकारी नियमांची पायमल्ली करून महापौरांनी हा ठराव घेतल्याचा आरोप करत भाजपा सदस्यांनी या ठरावास विरोध केला. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.भिवंडी महापालिकेत पाच नामनिर्देशित स्वीकृत सदस्य निवडीसाठी सर्वसाधारण विशेष महासभा महापौर जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरसेवकांच्या गटानुसार काँग्रेसला तीन, शिवसेनेला एक व भाजपास एक असे एकूण पाच स्विकृत सदस्य निवड करण्यासाठी नगरसचिवांनी कळवले होते. सरकारी नियमानुसार नामनिर्देश सदस्यांसाठी विधी ,वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, सनदी अधिकारी किंवा लेखापाल, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती निवडून देणे अपेक्षित आहे. त्यासाठी एक वकील, दोन डॉक्टर व इतर समाजसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी भाजपाने वकील हर्षल पाटील यांची सदस्य म्हणून शिफारस केली. तर शिवसेनेने ग्रामीण भागातील देवानंद थळे यांचे नाव सुचवले. तर काँग्रेस नगरसेवकांनी सिध्देश्वर कामुर्ती, राहुल पाटील व मोह. साजिद अश्फाक खान यांची शिफारस केली. या पाचजणांची नामनिर्देश सदस्य म्हणून नेमणुकीसाठी महापौरांनी घाईघाईने ठराव घेत मंजूर केला.ठराव घेण्याअगोदर नगरसचिव प्रस्तावना वाचत असताना सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालत बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला. तसेच सरकारी नियम डावलून हा ठराव घेतल्याचा आरोप करत विरोधा पक्षनेते श्याम अग्रवाल यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी ठरावास विरोध केला.तसेच ठराव घेण्यापूर्वी आयुक्तांनी उमेदवारांची चौकशी करून नामनिर्देश सदस्यासाठी पात्र सदस्यांच्या शिफारशीची माहिती महापौरांनी दिली होती. परंतु ती शिफारस डावलून स्विकृत सदस्यांची निवड झाली.>कादगपत्रांची पडताळणी करापात्र डॉक्टर उमेदवारांची निवड न केल्याने काँग्रसचे सुजाऊद्दीन अन्सारी व तारीक फारूकी हे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. तर निवडून आलेल्या सदस्यांच्या दाखल कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी भाजपा नगरसेवक प्रकाश टावरे यांनी केली. या सर्व गोंधळामुळे नामनिर्देशन स्विकृत उमेदवारांची निवड वादळी ठरली आहे.