शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

लेखकांचा 'ॲक्सेप्टन्स' आपल्या मराठी समाजात नाही; डॉ. नितीन रिंढे यांनी व्यक्त केली खंत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 14, 2024 13:46 IST

साहित्याचा प्रभाव पडण्याची क्षमता आणि वाचनाचे खूप कमी झालेले प्रमाण ही यामागची कारणे असल्याचेही केले नमूद

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लेखकांचा ॲक्सेप्टन्स आपल्या मराठी समाजात नाही, इथे लेखकाला कोणी ओळखतही नाही. याचे मुख्य कारण साहित्याचा प्रभाव पडण्याची क्षमताच आणि वाचनाचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. या दोन गोष्टीमुळे समाजभान वाढविण्यासाठी, समाजात संस्कार करण्यासाठी साहित्याचा उपयोग फारसा होताना दिसत नाही. ज्या समाजात वाचन टिकून आहे त्या समाजाची विवेकशक्ती देखील टिकून असते आणि त्या समाजाला भवितव्य सुद्धा आहे. आपल्याकडे ती समस्या मोठी आहे. आपल्याकडे वाचनच कमी असल्याने साहित्याचा परिणाम किती होणार? परंतू वाचन पुढे वाढेल असे आशावादी राहूया असे मनोगत डॉ. नितीन रिंढे यांनी व्यक्त केले. 

विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या विसाव्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. नितीन रिंढे यांचे 'साहित्य व समाजभान' या विषयावर रविवारी सकाळी थोरले बाजीराव पेशवे सभागृह येथे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की, लेखक हा सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणामधून तयार होत असला तरी सुद्धा ते एकांगी वाढणे नसते. त्या व्यक्तीचा जन्म झाल्यापासून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पिंड बनलेला असतो. त्यात अनुवंशिक गोष्टी देखील आलेल्या असतात. काही गोष्टी आधीपासून चालत आलेल्या पिंडाबद्दल असतील आणि काही गोष्टी अधिक प्रमाणातल्या या भोवतालच्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणामधल्या असतील. त्यानुसार जगाचे अनुभव घेतो. यातून तो इनपूट घेत जातो आणि हळूहळू त्याचे व्यक्तिमत्त्व आकाराला येईल. एकाच पर्यावरणात दोन लेखक लिहीत असले तरी ते वेगवेगळ्या प्रकारचा आशय मांडत आहेत कारण त्यांची जीवनदृष्टी वेगळी आहे, त्यांच्यावर झालेला संस्कार आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद वेगळा आहे. पण तरीसुद्धा भोवतालातूनच लेखक घडतो हे सत्य मात्र आपल्याला टाळता येत नाही. असे कोणतेही पुस्तक नाही की पुस्तक वाचून माणूस बदलला ही गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे. पुस्तक वाचनाची क्रिया ही बौद्धीक आहे, त्यात मेहनत आहे, कष्ट आहेत. हल्ली लोक का वाचत नाही कारण त्यांना कष्ट आणि मेहनत नको असते असे ते म्हणाले. यावेळी डॉ. विजय बेडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष राणे तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य सुभाष शिंदे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणे