शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील प्रकल्पांसाठी भूसंपादनाला गती द्या, विभागीय आयुक्तांची तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 21:54 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे युध्द पातळीवर

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे युध्द पातळीवर

ठाणे : जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग, डीएफसीएल, कल्याण-कसारा रेल्वे मार्ग आणि समृध्दी महामार्ग आदी विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेत त्यांच्या भूसंपादनाच्या कामाला गती देण्याची तंबी कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी जिल्ह्यातील या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना गुरूवारी दिली.                         जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे युध्द पातळीवर सुरू आहेत. त्यास अनुसरून या प्रकल्पांच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला अधिक गती द्यावी. या कामात येणा:या अडचणी तत्काळ दूर करा आणि भूसंपादन प्रक्रि या पूर्ण करावी. जिल्ह्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प पायाभूत प्रकल्प आहेत. त्यांच्या कामांना गती यावी, यासाठी भूसंपादन वेळेत होणो आवश्यक आहे. भूसंपादना अभावी प्रकल्पाचे काम रखडू नये, यासाठी यंत्रणांनी भूसंपादनात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढावा, असे मार्गदर्शन पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले.                         जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग, कल्याण-कसारा रेल्वे मार्ग, समृध्दी महामार्ग आदी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांच्या कामाचा आढावा पाटील, यांनी घेऊन अधिका:यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पुनर्वसन उपायुक्त पंकज देवरे, ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, ठाण्याचे प्रांताधिकारी अविनाश शिंदे, उल्हासनगर प्रांताधिकारी जयराज कारभारी आदींसह यावेळी भिवंडी, कल्याण उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांची माहिती या आढावा बैठकीत दिली. या बैठकीला भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रशांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रेवती गायकर, आदी उपिस्थत होते. 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी