शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींवर अत्याचार, शाळेच्या सुरक्षा रक्षकाला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By अजित मांडके | Updated: September 25, 2023 17:08 IST

ठाणे न्यायालयाचा निकाल

ठाणे : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकास शंकर चव्हाण(३५)  या नराधम ठाणे महापालिकेच्या शाळेवरील सुरक्षारक्षकाला ठाणे अतिरिक्त जिल्हा ( विशेष पोस्को) न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांनी सोमवारी दोषी ठरवत, ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली अशी माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी दिली. ही घटना कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्ट २०१६ रोजी घडली होती.

आरोपी विकास हा कोपरी गाव येथील ठाणे महानगरपालिका शाळा नं. १६ या शाळेचा सुरक्षारक्षक आहे. सध्या त्याला निलंबित करण्यात आलेले आहे. त्याने त्या शाळेत शिकणाऱ्या  दहा वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरी पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर हा खटला न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांच्यासमोर सुनावली आला.

यावेळी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी ११ साक्षीदार तपासले. तसेच सुनावणी दरम्यान सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी विकास याला ५ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास शंभर दिवस साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एम डी जाधव यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई सुशील डोके यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी