शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विनापरमिट धावताहेत साडेचार हजार रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:24 IST

ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे.

ठाणे : ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच येत्या सोमवारपासून एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेतील नोंदणी केलेल्या रिक्षांची काटेकोरपणे तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ सूत्रांनी सांगितले.ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नोंदणी केलेल्या आॅटोरिक्षांना ‘मे’ महिन्यात एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेनुसार १० हजार रिक्षांना नंबरवाटप केले आहे. यावेळी आॅटोरिक्षाधारकांनी ठाणे कार्यालयाकडे रिक्षापरवाना घेण्यासाठी अर्जाद्वारे त्याचे इरादापत्र प्राप्त करून त्याआधारे वाहनाची नोंदणी करून घेतलेली आहे. मात्र, कार्यालयीन तपासणीत १० हजार नोंदणी झालेल्या आॅटोरिक्षांपैकी साडेपाच हजार रिक्षाचालकांनी परमिट घेतले असून उर्वरित साडेचार हजार रिक्षाचालकांनी कागदपत्रे (पक्का परवाना, योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र) परिपूर्ण करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेतील सर्व रिक्षा परवानाधारक-मालकांनी त्यांच्या रिक्षाच्या कागदपत्रांची ठाणे आरटीओ कार्यालयात पूर्तता करून घ्यावी व मूळ वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन आरटीओने केले आहे.दरम्यान, आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत ९ जुलैपासून एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेमधील नोंदणी केलेल्या रिक्षांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी वैध कागदपत्रे सोबत न बाळगणाºया रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. तसेच काही रिक्षाचालकांनी १५ हजारांचे डीडी कार्यालयात जमा केले आहेत. पण, आॅनलाइन प्रक्रिया झाल्याने ते डीडी आरटीओ विभागाला भरता येत नाहीत. ते त्या रिक्षाचालकांनी परत नेण्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. त्याला १५-२० दिवस झाल्यानंतर अद्यापही कोणी आलेले नाही.- तपासणी मोहिमेसाठी चार वायुवेग पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात दोन जण असणार असून ते ठाणे-भिवंडी-भार्इंदर परिसरात तपासणी करणार आहे. सर्वाधिक रिक्षा भिवंडी-भार्इंदर या परिसरात धावत आहेत. या तपासणीत वैध कागदपत्रे सापडली नाहीत, तर त्या रिक्षाचालकांकडून मोटार वाहन कायद्यांतर्गत चार हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे