शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषा नसल्याने इमारतींना सरसकट परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:08 IST

नियोजनाचा अभाव : २००५ च्या पुरानंतरही प्रशासनाने घेतला नाही धडा, पालिकेची चूक नागरिकांना भोवली

बदलापूर : बदलापूरमधून वाहणारी उल्हास नदी पावसाळ्यात किती विस्तीर्ण होते, याचा अनुभव बदलापूरकरांनी दोन वेळा घेतला आहे. नदीपात्रात नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीही पाण्याखाली गेल्याने शहराचे नियोजन चुकल्याचे निश्चित झाले. मात्र, ही चूक दुरुस्त करण्यासाठी कुणीच पुढाकार घेताना दिसत नाहीत. २००५ च्या पुरातून कोणताही बोध न घेणाऱ्या बदलापूरने जी चूक केली. ती २०१९ च्या पुरात उघड झाली. आता पुन्हा ती चूक होणार नाही, यासाठी पूररेषा निश्चित करण्यासाठी पालिकेने पाठपुरावा करण्याची गरज आहे.२००५ च्या महापुराच्या वेळेस बदलापूरमध्ये इमारतींची संख्या कमी होती. या पुरात संपूर्ण बदलापूर पाण्याखाली आले होते. त्यामुळे या पुरानंतर बदलापूरचा विकास करताना पुराचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, २००५ च्या पुरातून बदलापूर काहीएक शिकले नाही, हे उघड झाले. या पुरानंतरही उल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या इमारतींना बांधकाम परवानगी देताना कोणतीच दक्षता घेतली नाही. आलेले प्रस्ताव आहे त्या परिस्थितीत मंजूर करण्यात आले. नदीच्या पुराच्या पाण्यात इमारत येणार, हे माहीत असतानाही इमारतींना मंजुरी दिली. पालिकेची हीच चूक अनेकांच्या जीवावर बेतली. अर्थात, पालिकेने इमारतींना मंजुरी देताना उल्हास नदीची पूररेषा लक्षात घेऊन परवानगी देणे गरजेचे होते. मात्र, लघुपाटबंधारे विभागाने पूररेषाच निश्चित न केल्याने पालिकेनेही कोणताही पाठपुरावा न करता थेट परवानगी देत गेले.नदीपात्राजवळ असतानाही इमारतीच्या तळ मजल्यावर फलॅटची परवानगी दिली. आज या परवानगीमुळे सर्वाधिक फटका बदलापूरला बसला. उल्हास नदीचा प्रवाह भिवपुरी येथून सुरू झाल्यावर बदलापूरमध्ये येतो. तो पुढे कल्याणमार्गे कल्याण खाडीला मिळतो. त्यामुळे बदलापूर शहरातून जाणाºया या मुख्य नदीची पूररेषा निश्चित करण्याची जबाबदारी कुणीच घेतली नाही. ही रेषा निश्चित झाल्यास अनेक बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फटका सहन करण्याची वेळ येणार, हे निश्चित झाले होते. त्यामुळे बिल्डरवजा राजकारण्यांनीही त्यासाठी प्रयत्न केले नाही. आज याच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे बदलापूरला सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे.पूररेषेबाबतची सर्व जबाबदारी ही लघुपाटबंधारे विभागाची आहे. मात्र, कर्जतपासून कल्याण ग्रामीणपर्यंत पूररेषा अजूनही निश्चित झालेली नाही. आता पूररेषेवर अवलंबून न राहता बदलापूरमध्ये यापुढे उल्हास नदीच्या परिसरातील भागात इमारतींना परवानगी देताना तळ मजल्यावर फ्लॅटला मंजुरी न देण्याचा ठराव करून सरकारकडे पाठवला जाईल.- प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी

टॅग्स :floodपूर