शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

थीम पार्क घोटाळ्यातील दोषींना अभय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:38 IST

१६ कोटींच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या प्रशासनाच्या समितीने थीम पार्क प्रकरणी आपला अहवाल समोर ठेवल्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

ठाणे : थीम पार्कच्या १६ कोटींच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या प्रशासनाच्या समितीने थीम पार्क प्रकरणी आपला अहवाल समोर ठेवल्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण या प्रकरणी कोणावर कारवाई केली, कोणती कारवाई झाली याची माहिती मात्र अद्याप प्रशासनाने दिलेली नाही. यामुळे दोषींना अभय दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून याप्रकरणी प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.ठाणे महापालिकेत थीमपार्क आणि बॉलीवूड पार्क ही दोन प्रकरणे लोकसभा निवडणुकीच्या आधी चांगलीच चर्चेत आली होती. या प्रकरणी भाजप, राष्टÑवादी यांनी आक्रमक भूमिका घेऊन थीमपार्कमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच या संदर्भात लोकप्रतिनिधींची चौकशी समितीही नेमण्यात आली होती. यामध्ये विविध पक्षांचे गटनेते, सभागृह नेते, महापौर यांच्यासह ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते, अशांचा या चौकशी समितीत समावेश होता. दुसरीकडे लोकप्रतिनिधींची समिती नेमली जात असतांना प्रशासनाने सुद्धा अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून थीपपार्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले होते. तसेच या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासनही दिले होते. परंतु, त्याचे पुढे काय झाले कोणावर दोषारोप ठेवण्यात आले, कोणावर झाली, याची काहीच माहिती प्रशासनाकडून अद्याप पुढे ठेवण्यात आलेली नाही.लोकप्रतिनिधींच्या समितीला चौकशीसाठी निवृत्त अधिकारीच मिळत नाहीत. प्रशासनाकडूनसुद्धा योग्य ते सहाकार्य लाभत नसल्याचे बोलले जाते. मध्येच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि या सर्वच प्रकरणावर पडदा पडला. आता निवडणूक आचारसंहिता संपल्याने लोकप्रतिनिधी या संदर्भात बैठक घेऊन कारवाईची मागणी करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.>दोषी अधिकारी मोकाट : थीमपार्क घोटाळ्याप्र्रकरणी आतापर्यंत ठेकेदाराची बँक गॅरंटी व अनामत रक्कम जप्त करून दोषी अधिकाऱ्यांची विभागिय चौकशीच्या घोषणेशिवाय काहीच हालचाल झालेली नाही. खरे तर ठेकेदारासह संबधित अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थाकडून होत आहे. मात्र, महापालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्यांना अभय दिल्याने ते मोकाट आहेत.