शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

सुमारे आठ लाख मतदार ओळखपत्राविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:23 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने गुरुवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने गुरुवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यामध्ये ३३ लाख २१ हजार ७५८ पुरुष, तर २७ लाख ७० हजार ९४९ महिलांचा समावेश आहे. उर्वरित मतदारांमध्ये तृतीयपंथी ३४०, अनिवासी भारतीय ४०, तर सशस्त्र दलातील १२२१ मतदार आहेत. त्यापैकी सात लाख ६९ हजार ५५२ मतदारांकडे ओळखपत्रे नाहीत.जिल्ह्यात ऐरोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चार लाख ३४ हजार ९३५ मतदार आहेत. याप्रमाणेच मीरा-भार्इंदरमध्ये चार लाख २२ हजार २७९, कल्याण पश्चिमला चार लाख २८ हजार ८१४, ओवळा-माजिवडा चार लाख २१ हजार ११८, कल्याण ग्रामीण चार लाख तीन हजार २०, मुरबाड तीन लाख ७८ हजार ५३०, बेलापूर तीन लाख ६८ हजार ५४३, मुंब्रा-कळवा तीन लाख २८ हजार ४५०, अंबरनाथ तीन लाख दोन हजार ५४६, कल्याण पूर्व तीन लाख ३३ हजार ९७१, डोंबिवली तीन लाख ३८ हजार २१७, कोपरी-पाचपाखाडी तीन लाख ४२ हजार ७९३, ठाणे तीन लाख १८ हजार ६७, भिवंडी दोन लाख ७९ हजार ३४०, शहापूर दोन लाख ४४ हजार ९०, भिवंडी पश्चिम दोन लाख ६४ हजार ६७८, भिवंडी पूर्व दोन लाख ६३ हजार ६७ तर उल्हासनगर विधानसभेत दोन लाख २१ हजार ८५० मतदार आहेत.३४० तृतीयपंथींना मतदानाचा हक्क: जिल्ह्यातील ३४० तृतीयपंथींना मतदानाचा हक्क मिळाला आहे. यापैकी सर्वाधिक ८१ तृतीयपंथींची नोंदणी कल्याण पूर्व, भिवंडी पश्चिमला ७०, कल्याण ग्रामीण ५५, तर ऐरोलीला २५ तृतीयपंथी मतदारनोंदणी करण्यात आली आहे.सर्वाधिक महिला मतदार कल्याण पश्चिममध्येसर्वाधिक दोन लाख एक हजार ७८१ महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. मीरा-भार्इंदरला एक लाख ९६ हजार ६८४, ओवळा-माजिवडा मतदारसंघात एक लाख ९१ हजार ५७७, ऐरोलीत एक लाख ८५ हजार ८४१ महिला मतदार आहेत. सर्वात कमी महिला मतदार ९९ हजार ६८२ उल्हासनगर येथे आहेत.6,488 मतदान केंद्रेजिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत सहा हजार ४८८ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. यापैकी मुरबाडमध्ये ४५६, ऐरोली ४३३, मीरा-भार्इंदर ४१६, कल्याण पश्चिम ४०९, ओवळा-माजिवडा ४०१, बेलापूर ३८६, मुंब्रा-कळवा ३५१, ठाणे ३७७, कोपरी ३६८, कल्याण ग्रामीण ३८९, डोंबिवली ३०३, कल्याण पूर्व ३४५, अंबरनाथ ३०३, भिवंडी पश्चिम ३११, शहापूर ३२६, भिवंडी ग्रामीण ३४९, भिवंडी पूर्व २८८, उल्हासनगर २७७ मतदान केंदे्र आहेत.जिल्ह्यात नऊ लाख ४३ हजार ३१० युवा मतदारजिल्ह्यातील युवा मतदारांनी नावनोंदणीस चांगला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये १९ वयोगटातील ४३ हजार ७५८ मतदार आहेत, तर २९ वयोगटात आठ लाख ९९ हजार ३५२ मतदार आहेत. ३९ वर्षे वयोगटात १४ लाख ७१ हजार २७९, तर ४९ वयोगटात १५ लाख ६३ हजार २१०, तर ५९ वयोगटात १० लाख ८५ हजार ४२६, तसेच ६९ वयोगटापर्यंतचे सहा लाख १३ हजार ६२९ तसेच ७९ वयोगटापर्यंत दोन लाख ७३ हजार ६८३ आणि ८० वयोगटाच्या पुढील एक लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक