शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातील अनधिकृत बांधकामांना अभय; सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर

By जितेंद्र कालेकर | Updated: December 24, 2023 19:54 IST

ठाणे किंवा राज्यातील कोणत्याही महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

ठाणे: ठाणे किंवा राज्यातील कोणत्याही महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी अलिकडेच दिले होते. याच पार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवून कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहिती महापालिका प्रशासनाने रविवारी दिली.

ठाणे शहरातील मानपाडा, माजीवडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील अनधिकृत बांधकामांवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नागपूर येथील अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली होती. त्याचवेळी त्यांनी उपरोधिकपणे सत्ताधाऱ्यांना घरचा आहेरही दिला होता. अनधिकृत बांधकामांना अभय दिल्यानंतर कारवाई करुन घ्यायची नसल्यास अधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेमध्ये नियुक्तीवर यावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. ठामपा क्षेत्रात अनधिकृत बांधकामांसाठी प्रती चौरस फूटांमागे अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याच लक्षवेधीवर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे तसेच अशा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्याचबरोबर अशी बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही संकेत त्यांनी दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना ४५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली होती. कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी सूचना देऊनही अशा बांधकामांवर कारवाई केली नसल्याचेही रोडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. ठाणेकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी यापूर्वीही ठाणे महापालिका मुख्य भवनासमोर काही नागरिकांनी फलकबाजी केली होती. त्यावेळी ठाणेकर हे चर्चेत आले होते. आताही त्यांना निलंबनाऐवजी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका