शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

प्रचारासाठी लवकरच होणार ‘मैदान ए जंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:33 IST

अंतिम टप्प्यात धुरळा; मैदाने आरक्षणासाठी लागणार चढाओढ

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून खलबते सुरू असतानाच राजकीय पक्ष मेळावे आणि बैठकांनाही प्राधान्य देत आहेत. उमेदवार आणि रणनीती ठरल्यानंतर प्रचारसभांसाठी मैदाने मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.लोकसभेच्या कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांत कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिसर येतो. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा, पूर्वेतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल तर कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान, मॅक्सी ग्राउंड (यशवंतराव चव्हाण क्रीडांगण), फडके मैदान तसेच पूर्वेकडे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण अशी मोठी मैदाने प्रचारासाठी आहेत. यातील सुभाष मैदान आणि मॅक्सी ग्राउंड ही मैदाने विशिष्ठ ठरावान्वये फक्त खेळासाठीच राखीव आहेत. अपवाद म्हणून राष्ट्रीय व्यक्तींच्या सभांसाठी ही मैदाने देण्याबाबत केडीएमसी निर्णय घेणार आहे.कल्याण आणि भिवंडी मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोठ्या सभा घेण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहणार आहे. २ एप्रिलनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी करणे, माघार घेणे, उमेदवारांची यादी जाहीर करणे ही प्रक्रिया पार पडेल.साधारण मार्चच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मैदान आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू होण्याची शक्यता आहे. कल्याण मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथमधील नेताजी मार्केट ग्राउंड, गावदेवी मैदान तर उल्हासनगरमधील गोल मैदान, व्हिटीसी ग्राउंड आणि दसरा मैदान ही मैदानेही प्रचार सभांसाठी सज्ज आहेत. परंतु, ती आरक्षित करण्यासंदर्भातही एकही अर्ज अद्यापपर्यंत आलेला नाही. कल्याण-डोंबिवलीतील मैदानांसंदर्भात केडीएमसीचे मालमत्ता व्यवस्थापक प्रकाश ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मैदान राखीव करण्यासंदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाचा अर्ज आलेला नसल्याची माहिती दिली.प्राधान्यक्रम ठरवणारमैदाने आरक्षित करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ पाहायला मिळेल. परंतु, मैदानासाठी ज्याचा अर्ज पहिला येईल त्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे. रोस्टर पद्धतीने मैदाने प्रचार सभांसाठी उपलब्ध होणार आहेत.मेळावे, बैठकांवर भरसध्या मेळावे आणि बैठका घेण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे. राष्ट्रवादीतर्फे बुधवारी कल्याण पूर्वेत मेळावा होत आहे. अशा मेळाव्यांसाठी प्रामुख्याने मोठी सभागृहे घेतली जातात.कल्याण-डोंबिवलीत साधारण १० ते १२ मोठी सभागृहे आहेत. त्यामुळे सध्या ही सभागृहे आरक्षित करण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहील.मार्च, एप्रिल हा लग्न सराईचा कालावधी पाहता सभागृहांची उपलब्धता हा देखील कळीचा मुद्दा राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक