शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी ५०८५७ कुटुंबांची आधार लिंक पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 11:49 IST

  सर्वेक्षणातील या कुटुंबातील सदस्यांचे आधारलिंक ( सीडिंग) करण्याचे काम कोरोनाच्या महामारीतही ठाणे जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आलेले आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार संथगतीने सुरू असले तरी ग्रामीण भागात आवास योजनेची विविध कामे नियमित सुरू आहेत.

ठाणे  - प्रधानमंत्री आवास योजने तील घरकूल लाभाच्या दृष्टीने जिल्ह्यातील ५७ हजार ३२९ कुटुंबांपैकी ५० हजार ८५७ कुटुंबाचे आधार लिंक (सिडिंग) करण्यात आलेले आहे. आधार लिंक केलेल्या या ग्रामीण भागातील कुटुंबियांचा जिल्ह्याच्या सन २०१८-१९ या कालावधीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या 'प्रपत्र ड' यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीस अनुुुुसरुन  केंद्र शासनाकडून एका घरकुलासाठी एक लाख 20 हजार रुपये प्रमाणे या यादीतील  सर्वंच परिवारासाठी हे अनुदान मंजूर करण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदे कढून व्यक्त होत आहे.   

  सर्वेक्षणातील या कुटुंबातील सदस्यांचे आधारलिंक ( सीडिंग) करण्याचे काम कोरोनाच्या महामारीतही ठाणे जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आलेले आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार संथगतीने सुरू असले तरी ग्रामीण भागात आवास योजनेची विविध कामे नियमित सुरू आहेत. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली  'जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा' या विभागाने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ग्रामीण भागात घरकुल बांधणीत अव्वल काम केले आहे. यास अनुसरुन या प्रधानमंत्री आवास योजनेत ज्या कुटुंबाचे नावे नाहीत मात्र योजनेच्या निकषामध्ये ते कुटूंब बसू शकतात, अशा कुटुंबांची नावे ग्रामसभेच्या अनुमतीने सुचवण्यात आली आहेत. त्यांचा समावेश या प्रपत्र ड या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. ते कुटुंबीय २०१८-१९ या कालावधीतील आहेत. त्यांचे सर्वेक्षण 'आवास प्लस' या संकेतस्थळावर करण्यात आलेले आहे.  प्रपत्र ड यादीतील कुटुंबाचे सर्वेक्षण झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून तालुकास्तरावर असणाऱ्या घरकूल कक्षाकडे या कुटुंबांची यादी पाठवून त्यांचे डाटा इन्ट्री ऑपरेटरद्वारे आधारलिंक करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील या ५७ हजार ३२९ कुटुंबांपैकी ५० हजार ८५७ कुटुंबाचे आधार लिंक( सिडिंग) करण्यात आलेले आहे. यामुळे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम येत्या दोन दिवसात १५ जुलैपर्यन्त पूर्ण करण्याचें उद्दिष्ट असल्याचे प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते यांनी सांगितले. या उर्वरित उद्दिष्टे देखील वेळेत पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले आहे. सध्या तरी आधार लिंक करण्याचे उद्दिष्ट ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित १० टक्के काम बाकी आहे. या 100  टक्के उद्दिष्ट साध्य झाल्या नंतर  शासन 2020- 21 वर्षा साठी लक्षाक निश्चित करुन देणार आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाthaneठाणे