शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

 अवघ्या ३०० रुपयांसाठी कळव्यात युवकाला विवस्त्र करीत बेदम मारहाण; एकाला अटक दुसरा पसार

By जितेंद्र कालेकर | Updated: November 22, 2023 19:28 IST

हातउसने घेतलेल्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडला.

ठाणे :  उसने घेतलेले तीनशे रुपये परत देण्यासाठी तसेच घरातील ब्लूटूथ हेडफोन घेउन गेल्याच्या कारणाने एका १७ वर्षीय मुलाला कपडे काढून गंभीर मारहाण करीत कळव्यातील बाजारपेठेत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे उघड झाला आहे. यात एकाने मारहाण केली तर दुसऱ्याने त्याचा व्हिडीओ बनवला. याप्रकरणी जखमी युवकाने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तौसिफ खानबंदे याला अटक केली असून त्याचा मित्र सामिल खानबंदे हा पसार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. कळवा येथे राहणारा जखमी युवक ज्या सोसायटीत राहतो. 

तेथे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तौसिफ आणि त्याचा मित्र सामील खानबंदे हे दोघे आले. त्यावेळी तौसिफ याने जखमी मुलाला तू माझ्या घरी येवुन ब्लुटुथ हेडफोन घेवुन का गेलास, अशी विचारणा करीत शिवीगाळी केली. याचदरम्यान तौसिफ याने पिडित मुलाने घेतलेले हातउसणे तीनशे रुपयांचीही मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून तौसिफ याने अनकुचीदार हत्याराने या पिडित मुलाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली हल्ला केला. मला आताच पैसे पाहिजेत नाहीतर तुला सोडणार नाही, अशीही दमबाजी त्याने केली. तसेच त्याचा मित्र सामिल यानेही पिडित मुलाला हाताच्या चापटीने मारहाण केली. त्यानंतर तौसिफ याने युवकाच्या पॅन्टचा बेल्ट काढून त्याच बेल्टने त्याच्या पाठीवर मारहाण केली. याचदरम्यान त्या दोघांनी मिळून त्या मुलाचा शर्ट काढला. येवढ्यावर ते थांबले नाहीतर तौसिफ याने युवकाची पॅन्ट देखील उतरवली. त्यानंतर त्यांनी मारहाण करीत त्याला बाजारपेठेत फिरवले. या मारहाणीचा व्हिडीओ सामील याने बनवला. त्यानंतर यातील जखमी युवकाने झालेला प्रकार कळवा पोलिसांना सांगितल्यावर याप्रकरणी बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल केला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तौसिफ याला सकाळी राहत्या घरातून अटक केली. मात्र त्याचा मित्र पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हातउसने घेतलेल्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडला. यामध्ये अल्पवयीन युवकाला मारहाण करण्यात आली आहे. तर त्या मारहाणीचा व्हिडिओही शूट करण्यात आला. मारहाण आणि व्हिडिओ बनवणारे अल्पवयीन नाहीत. याप्रकरणी गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. - कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी