शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

ठाण्यातील कोपरी भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला अटक; पाच तरुणींची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: July 18, 2023 18:49 IST

कोपरीतील रेल्वे स्थानक परिसरातील शिवम हॉटेल भागात एक दलाल महिला काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.

ठाणे: ठाण्यातील कोपरी भागात गरिब मुलींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी मंगळवारी दिली. या महिलेच्या तावडीतून पाच पिडित तरुणींची सुटकाही करण्यात आली आहे.

कोपरीतील रेल्वे स्थानक परिसरातील शिवम हॉटेल भागात एक दलाल महिला काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिवम हॉटेल परिसरात या पथकाने सापळा रचून एका बनावट गिºहाईकाला त्याठिकाणी पाठविले. त्याने या महिलेकडे मागणी केल्यानंतर त्याठिकाणी पाच तरुणी पाठविण्यात आल्या होत्या. या प्रकाराची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने यातील दलाल महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या तावडीतून २० ते २५ वयोगटातील पाच पीडित तरुणींची सुटका केली. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. यातील पिडित तरुणींना सुरक्षेच्या कारणास्तव ठाण्यातील मानपाडा येथील लिविंग वॉटर मिशन या संस्थेच्या सुरक्षा गृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे, गोवा आणि लोणावळ्यात रॅकेट ठाण्यातून एखाद्या डान्स शो इव्हेंट शो मध्ये काम करणाºया महिला किंवा तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांना शरीरविक्रयासाठी ही महिला भाग पाडत होती. त्यानंतर गोवा, महाबळेश्वर, पुणे, लोणावळा, इगतपुरी, मुंबई आणि ठाणे परिसरातील फार्म हाऊस किंवा फ्लॅटवर त्यांना पाठविले जात होते, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे. व्हॉटसअ‍ॅपवरुन फोटो पाठविले जायचे शरीरविक्रयासाठी तयार झालेल्या मुली किंवा महिलांचे फोटो व्हॉटसअ‍ॅपवरुन ग्राहकांना पाठविले जायचे. मग पसंतीनुसार दर ठरविल्यानंतर एका तरुणीसाठी दोन ते पाच हजारांची रक्कम ग्राहकांकडून घेतली जात होती, अशीही बाब समोर आली. 

टॅग्स :thaneठाणेSex Racketसेक्स रॅकेट