शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालास अटक , ३० हजारांमध्ये केला महिलेचा सौदा

By जितेंद्र कालेकर | Updated: January 13, 2023 18:47 IST

गरिब, गरजू महिला तसेच तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायात ओढणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली.

ठाणे: गरिब, गरजू महिला तसेच तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायात ओढणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली. तिच्या तावडीतून दोन पिडित महिलांची सुटका केल्याची माहिती गुन्हे शाखेने शुक्रवारी दिली.  

ठाण्यातील घोडबंदर रोड  भागातील लॅरिडा हॉटेल परिसरात एक २८ वर्षीय दलाल महिला  काही तरुणींकडून शरिर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याचआधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, जमादार श्रद्धा कदम, एस. व्ही. सोननीस, डी. व्ही. चव्हाण, भोसले, डी. के. वालगुडे, हवालदार पी. ए. दिवाळे आणि  अंमलदार आर. व्ही. कदम आदींच्या पथकाने १२ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड भागात सापळा लावला. त्यावेळी पोलिसांनी एका बनावट गिºहाईकाच्या माध्यमातून यातील दलाल महिलेला गाठले.

मुंबईतील अंधेरी भागातून आलेल्या या दलाल महिलेने ३० हजारांमध्ये एका महिलेचा सौदा केला. त्यासाठी ती सोबत दोन महिलांना घेऊन आली होती. तिला ही रक्कम दिल्यानंतर तिने त्यातील पाच हजार रुपये दोन्हींपैकी एका महिलेला तर २५ हजारांची रक्कम स्वत:कडे ठेवली.  या बनावट गिºहाईकाने या सर्व प्रकाराबाबतचा इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाड टाकून दलाल महिलेला ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिला राबोडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून तिच्या तावडीतून २५ ते २८ वर्षीय दोन महिलांची सुटका केली आहे. त्यांची सुधारगृहात रवानगी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.  पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर हे करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस