शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

११ वीच्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ५० वर्षानंतर अनोखे स्नेहसंमेलन!

By सुरेश लोखंडे | Updated: February 19, 2024 18:19 IST

विद्यार्थ्यांचे हे ५० वर्षानंतरचे स्नेह संमेलन म्हणजेच एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता.

ठाणे : ध. ना. चौधरी बहुउद्देशीय विद्यालयात १९७३-७४च्या बॅचला ११ वीच्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन अलिकडेच शास्त्री हॉल डोंबिवली पूर्व येथे पार पडले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सोडून पन्नास वर्षे पूर्ण झाली असतानाही या प्रदीर्घकालावधीनंतर त्यांनी एकमेकांचा कसाोशीन शोध घेऊन या ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तब्बल ५० वर्षानंतर स्नेहसंमेलनाच आनंद मनमुराध घेतला, असे यातील जेष्ठ नागरीक उज्वल जोशी यांनी 'लोकमत'ला सांगितले.

विद्यार्थ्यांचे हे ५० वर्षानंतरचे स्नेह संमेलन म्हणजेच एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता. या कार्यक्रमाला साधारण ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनी लगबगीने शाळेत हजर होत या साेहळ्याचा आनंद धेतला. आमच्याकडे फोन मोबाईल ईमेल फेसबुक अशी कम्युनिकेशनची साधने उपलब्ध नसल्याने मित्र, मैत्रिणी शोधायला खूपच वेळ लागला. शोधाशोध हे कठीण काम असतानाही आम्ही एकमेकांच्या सहाय्याने सर्वांचा शोध घेऊन पार पडलेल्या स्नेह संमेलनात आठवणी जागवल्या. संमेलनात आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची नोंद, आपल्या शेजारी बसलेल्यांची ओळख करून देणे, पन्नास वर्षात आलेले सामाजिक आणि नोकरीमध्ये आलेले चांगले अनुभव याची देवाणघेवाण, संगीत खुर्ची रिंग टाकणे, हौझी गाणी दरवाजा पुढील रांगोळी असे कार्यक्रम खेळ यावेळी उत्साहात पार पडले. अपरिहार्य कारणामुळे काही मित्र मैत्रिणी या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची अनुपस्थिती हजर असलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींना खूपच जाणवली.या वर्षी भेटवस्तू म्हणून शाळेचे नाव, बॅच चे सन व ५० - सुवर्ण वर्षाचा लोगो असलेली सौर समई भेट देण्यात आली.

या अनोख्या स्नेह संमेलासाठी उज्वल जोशी यांनी सांगितले की, शालेय वर्षांमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तू, तसेच त्यावेळी ज्या वस्तूंमुळे कदाचित शिक्षा भोगावी लागली अशा चणे दाणे , गोट्या, सागर गोटे, चिंच, बोरे लिमलेटची गोळी विविध प्राणी आणि इंग्रजी अक्षरे असलेली बिस्किट्स हा सारा खजिना गोळा करून तो यावेळी भेट देण्याचा एक अनोखा विचार आम्ही केला. त्याला सगळ्यांनीच भक्कम साथ दिली. त्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा शालेय जीवनात गेल्याची आठवण झाली. कुठलेही स्नेहसंमेलन किंवा कार्यक्रम हे एक टीमवर्क असते. त्यामुळे सगळ्यांनीच हा कार्यक्रम यशस्वी व्हायला खारीचा वाटा उचलला. काही ठळक नावे घ्यायची तर दिलीप कर्वे, अनुप आगटे, श्रीकांत दंडगे, डॉ. स्मिता फणसे, अलका फाटक, सुमन देशपांडे आणि उज्वल जोशी यांनी किंचित जास्त मेहेनत घेतल्याचे आढळून आले.

टॅग्स :thaneठाणे