शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारांनी लावली बाजी, खाडीमध्ये पडलेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीला वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 06:54 IST

भाईंदर व नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यान खाडीवर दोन मोठे रेल्वे पूल आहेत. रेल्वे पुलावर जाणे प्रतिबंधित आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावरून खाडीत पडलेल्या फातिमा जाफर शेख या १६ वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे प्राण त्या ठिकाणी असलेल्या दोघा अनोळखी तरुणांसह स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. रेल्वे पुलावर जाण्यास प्रतिबंध असताना विद्यार्थिनी तेथे पोहोचल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. 

भाईंदर व नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यान खाडीवर दोन मोठे रेल्वे पूल आहेत. रेल्वे पुलावर जाणे प्रतिबंधित आहे. पुलावर बंदोबस्त ठेवला जातो. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फातिमा भाईंदर येथील खाडीवरील रेल्वे पुलावरून खाली पडली. त्यावेळी भाईंदर पूर्व व पश्चिम खाडीकिनाऱ्यावर जमलेल्या काहींनी तिला पाण्यात पडल्याचे पाहिले आणि एकच गलका झाला. पश्चिमेस असलेल्या दोघा तरुणांनी खाडीत उडी मारून फातिमाला वाचवले. थर्माकोलच्या साहाय्याने तिला धरून ते दोन्ही तरुण खाडीच्या प्रवाहात तग धरून होते. भाईंदर रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर खाडीकिनारी जेसलपार्क चौकीत असलेले उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी स्थानिक मच्छीमार देवा यांना बोट घेऊन येण्यास कळवले. देवा यांच्यासह राजू वैती व सहकाऱ्यांनी बोटीने जाऊन खाडीच्या पाण्यात असणाऱ्या त्या दोन्ही तरुणांना आणि मुलीला बोटीवर घेत किनाऱ्यावर आणले. त्या दोन तरुणांनी तत्काळ खाडीत उड्या मारून फातिमाला वाचवले नसते तर ती बुडून प्रवाहाबरोबर वाहून गेली असती. 

 फातिमा नालासोपारा येथे राहणारी आहे. महाविद्यालयात शिकणारी फातिमा पुलावर गेली आणि पाय घसरून खाली पडली, असे पोलिसांनी सांगितले. तिला भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर पालकांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :fishermanमच्छीमारmira roadमीरा रोड