शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन सणाला भावाच्या घरी जाऊ न दिल्याने विवाहितेने केली आत्महत्या

By नितीन पंडित | Updated: September 9, 2023 19:57 IST

भिवंडीत विवाहितेचा छळ

भिवंडी: विवाहितेने लग्नात आपल्या माहेरून पतीसाठी मोटर सायकल आणली नाही यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या पती व सासरच्या मंडळींनी रक्षाबंधन सणाला विवाहितेस भावाच्या घरी जाऊन न दिल्याने व सासरच्या मंडळींच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर आपल्या सासरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी शांतीनगर पोलीस ठाण्यास पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कविता सुनील गौड असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. कविता हीचा विवाह सुनील सोबत झाला असताना तिचा पती सुनिल,सासरे रामअवतार,सासु लिलावतीदेवी,दिर सुधिर,नणंद गुंजन यांनी आपसात संगनमत करून कविता हिने पती साठी माहेरहून मोटार सायकल आणली नाही याचा राग मनात ठेऊन तुझे वडिल व भाऊ भिकारी आहेत,तुला घरातील कामे व्यवस्थीत करता येत नाही असे सतत टोमणे मारून तिच्या सोबत शिवीगाळ व मारहाण करून तिचा सतत शारीरीक व मानसीक छळ सुरू केला होता.

त्यातच रक्षाबंधन सणासाठी भावाच्या घरी जाण्यास सासु सासरे यांनी कविता हिस नकार दिल्याने,अखेर या सर्व त्रासाला कंटाळून कविता हिने भादवड येथील घरात बेडरूम मधील छताचे लोखंडी हुकास गळफास घेवुन आत्महत्या केली .या बाबत मयत कविता हीचा भाऊ भरतकुमार याने दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात पती सुनिल, सासरे रामअवतार,सासु लिलावतीदेवी, दिर सुधिर, नणंद गुंजन यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.