शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराअभावी गेला जीव, मुरबाडच्या तुळई केंद्रातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:10 IST

तालुक्यात म्हसा, नारिवली, तुळई, धसई, शिरोशी, मोरोशी, सरळगाव, शिवळे, किशोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, तेथे औषधसाठा, साहित्य उपलब्ध आहे. परंतु केंद्रात डॉक्टर किंवा कर्मचारी असतील याची शक्यता नसल्याने येणाऱ्या रुग्णांवर उपचार होईलच याची खात्री नसते. 

मुरबाड : तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे कामावर येत आहेत. परिणामी रुग्णांना वेळीत उपचार मिळत नाहीत. अशाच एका घटनेत तुळई येथील वसंत जाधव या शिक्षकाला जीव गमवावा लागला. 

तालुक्यात म्हसा, नारिवली, तुळई, धसई, शिरोशी, मोरोशी, सरळगाव, शिवळे, किशोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, तेथे औषधसाठा, साहित्य उपलब्ध आहे. परंतु केंद्रात डॉक्टर किंवा कर्मचारी असतील याची शक्यता नसल्याने येणाऱ्या रुग्णांवर उपचार होईलच याची खात्री नसते. 

तुळई गावातील वसंत जाधव यांच्या छातीत दुखत असल्याने ते मंगळवारी सकाळी १० वाजता गावातील तुळई आरोग्य केंद्रात गेले. तेथे दोन डाॅक्टर कार्यरत असताना डॉ. प्रियंका गोरडे या सकाळीच निघून गेल्या, तर डॉ. तेजश्री घोटकर या ११ वाजता आल्या. जाधव यांच्यावर तेथील परिचारिकेने थातूरमातूर उपचार करून त्यांना घरी पाठवले. 

- घरी जाताच जाधव यांची प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्यांना तातडीने मुरबाडला नेले. मात्र, रस्त्यातच त्यांचा जीव गेला. जर आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर असते तर या रुग्णाचा जीव गेला नसता. - अशा अनेक घटना घडत असताना आरोग्य यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने जबाबदार अधिकारी व डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा चौधरी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणी चौकशीसाठी आमचे पथक माहिती घेत आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई करण्यात येईल.     - गंगाधर परगे,     जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल