शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्र्यातील दोन घरांवर उच्च दाबाची वीज वाहिनी कोसळली; एकाच कुटुंबातील चार जण जखमी

By कुमार बडदे | Updated: May 22, 2023 17:05 IST

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच समाजसेविका मर्जिया पठाण यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना दिलासा दिला.

मुंब्राः येथील शिवाजी नगर भागातील जानकी व्हीला या इमारती जवळ असलेल्या बाबू पाटील चाळीच्या बाजूला असलेल्या बादशहा इस्लाम आणि फरीदा कुरेशी यांच्या तळ अधिक एक मजली घरांवर टाटा पाँवर कंपनीची उच्च दाबाची वीज वाहिनी सोमवारी दुपारी कोसळली.यामुळे लागलेल्या आगीत  भाडेतत्वावर रहात असलेल्या एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले.

अलिमउद्दिन कुरेशी (वय ३५),सलमा सय्यद (वय ३०),अलीना सय्यद (वय ५ ) आणि फातिमा सय्यद(वय ४)अशी जखमीची नावे असून,त्यांची छाती आणि चेहरा भाजला आहे.उपचारांसाठी त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.आगीत दोन्ही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,घरातील काँम्पुटर,लाकडी कपाट,शेगडी भांडी,पलंग,आदी संसार उपयोगी वंस्तू जळून खाक झाल्या.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहन आणि एक फायर वाहनाच्या मदतीने एक तासात अथक प्रयत्नानी आग विझवली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच समाजसेविका मर्जिया पठाण यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना दिलासा दिला. तसेच त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्ण वाहिकेची व्यवस्था केली. सोमवारी ज्या ठिकाणी वाहिनी कोसळली त्या ठिकाणी या आधिही काही वेळा वाहिनी कोसळल्याची घटना घडली आहे. ती पुन्हा कोसळू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशां कडून करण्यात येत आहे.

टॅग्स :fireआगthaneठाणे