शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील २०१७ पासूनचा फरार गुन्हेगार काशीमीरामध्ये सापडला

By धीरज परब | Updated: March 9, 2024 17:43 IST

शिक्षा भोगत असतांना अभिवचन (पॅरोल) च्या रजेवर तो बाहेर आला पण पुन्हा कारागृहात १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत हजरच झाला नाही.

मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाण्यात २०१० साली केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असताना तो २०१७ सालापासून पॅरोलची रजा घेऊन फरार झाला होता. त्या गुन्हेगारास तब्बल ७ वर्षांनी अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. 

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत २०१० साली झालेल्या हत्येच्या गुन्ह्यात अटक आरोपी यकीनअली नासीरअली शेख ( वय ३६ वर्षे )  रा. गौरव संकल्प फेज ४, रवी ग्रुप, मीरारोड ह्याला ठाणे न्यायालयाने हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. शेख हा कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 

शिक्षा भोगत असतांना अभिवचन (पॅरोल) च्या रजेवर तो बाहेर आला पण पुन्हा कारागृहात १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत हजरच झाला नाही. कळंबा कारागृहात हजर न होता पळून गेलेला असल्याने त्याच्या विरुद्ध तेथील पोलीस कर्मचारी राजु शिंदे यांनी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात शेख विरुद्ध फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हयातील पाहीजे व फरारी आरोपीताचा शोध घेऊन अटक करण्याबाबतचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्याअनुषंगाने मीरा भाईंदर  गुन्हे शाखा कक्ष १ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक कैलास टोकले,  प्रशांत गांगुर्डे व पुष्पराज सुर्वे सह संदीप शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, समिर यादव, सुधीर खोत, प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, गौरव बारी, सौरभ इंगळे, किरण आसवले, सतोष चव्हाण यांच्या पथकाने शेख याचा शोध चालवला होता. 

तपास करीत असताना हवालदार पुष्पेंद्र थापा यांना शेख याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत ७ मार्च रोजी यकीनअली नासीरअली शेख (४६ )  ह्याला अटक केली. तो सध्या काशीगाव , सफारी हॉटेल मागील सन क्लब बिल्डींगमध्ये रहात होता. दहिसरच्या राजेश कंपाऊंड येथील नासिर अलि चाळ येथील पत्त्यावरचे त्याचे आधारकार्ड आढळून आले.  अटक करून त्याला काशीमीरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी