शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या चौक बंदरातील मासेमारी नौका आगीच्या भक्ष्यस्थानी

By धीरज परब | Updated: January 6, 2023 18:50 IST

बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेली बसत्याव मुंबईकर यांची जॉन पॉल ही नौका शुक्रवारी सायंकाळी मासेमारीसाठी समुद्रात रवाना होणार होती.

मीरारोड: भाईंदरच्या चौक बंदरात नागरुन ठेवण्यात आलेल्या जॉन पॉल या मासेमारी नौकेला शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारस भीषण आग लागली. यात नौकेचा मोठा भाग जळून गेला असून नाखवाचे सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

चौक येथील बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेली बसत्याव मुंबईकर यांची जॉन पॉल ही नौका शुक्रवारी सायंकाळी मासेमारीसाठी समुद्रात रवाना होणार होती. त्यामुळे मासेमारीसाठी लागणारे सर्व समान, अन्नधान्य, डिझेल नौकेत भरुन ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे चार वाजता नौकेला भीषण आग लागली. याची माहिती मिळताच आसपासच्या मच्छिमारांनी चौक बंदराकडे धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आग एवढी भीषण होती की ती नियंत्रणात येईना त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

आगीत नौकेच्या इंजीनसह सर्व सामान जळून नष्ट झाले आहे तसेच नौकेचा तांडेल कॅजिटन पास्कू मुंबईकर याला किरकोळ दुखापत झाली आहे. नौकेचे सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी देखील याच महिन्यात वादळामुळे या नौकेचे नुकसान झाले होते.समुद्रात सुटलेल्या जोरदार वार्‍यांमुळे शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मच्छिमार नाखवास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धी डोंगरी चौक फिशरमेन सर्वोदय सोसायटीने मत्स्यव्यवसय विभाग तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष विल्यम गोविंद यांनी दिली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfishermanमच्छीमार