शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

बापरे! चायनीज खाताना ग्राहकाला आढळली उंदराची विष्टा; भाईंदरमधील संतापजनक प्रकार 

By धीरज परब | Updated: March 30, 2023 16:29 IST

अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप  

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस फाटक मार्गावर असलेल्या एका चायनीज हॉटेलात जेवण्यास गेलेल्या ग्राहकाला जेवणात उंदराची लेंडी आढळल्याची तक्रार त्याने अन्न व औषध प्रशासनाला केली आहे . प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने लोकांच्या आरोग्य व जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

एसपी चायनीज पॉईंट ह्या हॉटेलात विजय मोरे हे सोमवारी दुपारी जेवणासाठी गेले होते . त्यावेळी त्यांनी मागवलेल्या जेवणात उंदराची लेंडी आढळली . त्याची छायाचित्रे घेऊन मोरे यांनी अन्न व औषध प्रशासना कडे तक्रार केली आहे . शिवाय सदर हॉटेल मध्ये तेल आदी पदार्थांचा दर्जा व स्वच्छते बाबत मोरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्ती मुळे नियमित तपासणी व कार्यवाही केली जात नाही. 

तक्रार करून देखील तातडीने येऊन पाहणी न करता केवळ कार्यवाहीचे आश्वासन देऊन पुरावे नष्ट करू दिले जात आहेत  असा आरोप त्यांनी केला .  तर सदर चायनीज हॉटेल शी संपर्क साधला असता ग्राहकाची तशी तक्रार असली तो करपलेला भात असल्याचे सांगण्यात आले.