शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडित महिला पोलिसावर आरोपी पोलिसाच्या फिर्यादी नंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल 

By धीरज परब | Updated: May 8, 2023 20:09 IST

तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या निर्देशा नंतर वाघ याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

मीरारोड - बलात्कार पीडित महिला पोलिसावर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून नयानगर पोलिसांनी एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस हवालदार प्रेमसागर वाघ विरुद्ध दिलेल्या तक्रारी नंतर नवघर पोलिसांनी बलात्कार सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. वाघ हा गुन्हा दाखल झाल्या नंतर पसार झाला होता. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या निर्देशा नंतर वाघ याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तर दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी वाघ याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

पोलिसांनी वाघ याची विभागीय चौकशी सुरु करून चौकशी अधिकारी म्हणून नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना नेमले होते . २१ एप्रिल २०२२ रोजी चौकशी कामी पीडित महिला पोलीस यांना नया नगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. 

त्यावेळी पीडित महिला पोलीसाने आपणा सोबत भांडण करून तुझ्या व तुझ्या मुलांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करेन, कुटुंबाला संपवून टाकेन अशी धमकी दिल्याची अदखलपात्र तक्रार वाघ याने नया नगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्या घटनेनं नंतर पीडितेने वाघ व मुलाविरुद्ध ईमेलद्वारे तक्रार केली होती. 

पीडितेस आपण अनुसूचितचा असल्याचे माहिती असून सुद्धा खोटी तक्रार करून अपमान केला तसेच मला व कुटुंबास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व जीवितास धोका निर्माण करण्याची शक्यता असल्याची फिर्याद वाघ याने दिल्या नुसार ६ मे रोजी पीडितेवर एट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या प्रकरणी सहायक आयुक्त विलास सानप हे तपास करणार आहेत. बलात्कार पीडितेवरच एट्रोसिटीचा गुन्हा आरोपीच्या तक्रारीवरून तोही एक वर्षानंतर दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर