शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका शाळेतील हिरकणी कक्षातील ओल्या पार्टी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2025 17:24 IST

Ulhasnagar News: महापालिका शाळा प्रांगणातील हिरकणी कक्षातील ओल्या पार्टीची तक्रार महापालिकेकडून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केल्यानंतर, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. असी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली असून आरोपी गजाआड होण्याचे संकेत दिले.

- सदानंद नाईक उल्हासनगर - महापालिका शाळा प्रांगणातील हिरकणी कक्षातील ओल्या पार्टीची तक्रार महापालिकेकडून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केल्यानंतर, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. असी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली असून आरोपी गजाआड होण्याचे संकेत दिले.

उल्हासनगर कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन चौक परिसरात महापालिका शाळा क्रं-२९ व ८ असून शाळेत शेकडो मुले शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. शाळेच्या आवारात ऐक नव्हेतर तीन हिरकणी कक्ष बनसविण्यात आले असून एका कक्षात ओली पार्टीचा भांडाफोड झाल्यावर खळबळ उडाली. याप्रकाराची दखल आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी घेतल्यावर, महापालिकेकडून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी दोन दिवसानंतर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली आहे.

लपवा छपवी महापालिका शाळा आवारातील तीन पैकी दोन हिरकणी कक्ष लॉकबंद असून ज्या हिरकणी कक्षात ओली पार्टी झाल्याचे उघड झाले, त्या कक्षाचे दरवाजे तुटलेल्या स्थितीत आहेत. ओल्या दारू पार्टीनंतर महापालिकेने शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे दुरस्त करून २४ तास सुरक्षारक्षक नेमण्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. तसेच हिरकणी कक्षाला सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ते कॅमेरे तपासले असतेतर, ओल्या दारू पार्टीचे खरे आरोपी उघड झाले असते. असी चर्चा रंगली आहे. यामध्ये आरोपीची लपवाछपवी सुरु आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला.

यापूर्वी शाळेत शिलाई मशीनचा साठा लोकसभा निवडणूक वेळी याच शाळेत विनापरवाना शिलाई मशीन व घंटागाडीचा साठा ठेवून महिलांना अवैधपणे वाटप केला होता. याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी