शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड मध्ये विकासकाची जमीन बळजबरीने कब्जा करणाऱ्या विकासकासह महिला, पुरुषांवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: January 14, 2024 23:43 IST

Mira Road Crime News: मीरारोड मधील आकृती हब टाऊन जवळ युनिक शांती डेव्हलपर्स यांच्या जमिनीवर महिला आणि पुरुषांची टोळी घेऊन कब्जा करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक विकासक व त्याचे ११ ते १३ महिला - पुरुष साथीदारांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

मीरारोड - मीरारोड मधील आकृती हब टाऊन जवळ युनिक शांती डेव्हलपर्स यांच्या जमिनीवर महिला आणि पुरुषांची टोळी घेऊन कब्जा करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक विकासक व त्याचे ११ ते १३ महिला - पुरुष साथीदारांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

मीरा भाईंदर मधील बडे विकासक असलेल्या युनिक शांती डेव्हलपर्सचे दिलेश शाह यांच्या फिर्यादी नुसार , मीरारोडच्या आकृती हब टाऊन जवळ असलेली मौजे नवघर येथील सर्व्हे क्रं. १३५ व १३६ मधील १ हजार ७५४ स्क्वेअर मीटर जागा युनिक शांती डेव्हलपर्सचे भागीदार दिलेश शाह व हार्दिक शाह यांनी खरेदी केली होती . जागेवर कोणी अतिक्रमण करू नये म्हणून साफसफाई करून जमिनीला पत्र्याचे कंपाउंड मारले . त्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावून खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केले . 

दरम्यान सदर जागेवर बळजबरीने कब्जा मिळवण्या करता काही महिला व पुरुषांची टोळी घुसखोरी करणे , सुरक्षा रक्षकांना धमकावणे आदी प्रकार करू लागले . ९ जानेवारी रोजी देखील देखील सदर जागेत घुसून महिला व पुरुषांच्या टोळीने सीसीटीव्हीची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना धमकावत बळजबरीने जागेत घुसखोरी केली . त्या प्रकरणी दिलेश शाह यांच्या फिर्यादी वरून  चंदन शांती ग्रुप ऑफ कंपनीचे नरेश शहा सह प्रशांत पांडे, ५ ते ६ महिला व ५ ते ६ पुरुष व्यक्तिंवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी