शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट: ९ दिवसांपूर्वी रोहितला वाचवणेच आरतीच्या बेतले जिवावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 06:04 IST

आरतीने पोलिसांपासून प्रेमसंबंध असल्याचे लपवून ठेवत मोबाइलचे प्रकरण मिटवून घेऊ, असे सांगत पोलिसांना कारवाईपासून रोखले नसते, तर कदाचित तिचा जीव वाचला असता.

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : नऊ दिवसांपूर्वी २२ वर्षीय आरती यादवने आरोपी रोहित यादवला आचोळे पोलिसांपासून वाचविले होते. त्याला वाचविण्याचे आरतीच्या जिवावर बेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी रोहितने मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती कामावर जात असताना रस्त्यात गाठून लोखंडी पान्याने १५-१६ वार करून तिची निर्घृण हत्या केली. आरतीने आचोळा पोलिसांपासून प्रेमसंबंध असल्याचे लपवून ठेवत मोबाइलचे प्रकरण मिटवून घेऊ, असे सांगत पोलिसांना कारवाईपासून रोखले नसते, तर कदाचित तिचा जीव वाचला असता.

सहा वर्षांपूर्वी संतोष भवन परिसरात आरती आणि रोहित आजूबाजूला राहण्यासाठी आले. तेथूनच दोघांची ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांपूर्वी दोघांनी आपल्या घरच्यांना याबाबत सांगून लवकरच लग्न करणार असे सांगितले होते. त्यानंतर आरती ही अलीकडेच संतोष भवन येथून आचोळ्याच्या शिर्डीनगर परिसरात राहण्यासाठी आली होती. मात्र, महिनाभरापूर्वीच दोघांचेही ब्रेकअप झाले होते.

आरतीनेच पोलिसांना कारवाईपासून रोखले- रोहित तिच्यासोबत बोलण्यासाठी मोबाइलवर फोन करायचा, पण ती उचलत नव्हती. म्हणून ८ जूनला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याने शिर्डीनगर परिसरात येऊन भांडण करत आरतीचा मोबाईल फोडला होता. त्यानंतर हा वाद आचोळा पोलिस ठाण्यात पोहोचला होता. 

- पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून ९ जूनला सकाळी हजर राहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखविण्यास सुरुवात केल्यावर आरतीने पोलिसांना थांबविले व कारवाई करू नका, म्हणून विनंती केली.

आरोपीला पोलिस कोठडीनालासोपारा : कामावर जाणाऱ्या आरती यादव हिची सर्वांसमक्ष दिवसाढवळ्या हत्या करणारा आरोपी रोहित यादव याला बुधवारी वसई सत्र न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वालीव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी आरोपीला बुधवारी दुपारी वसई दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश जी. जे. सुंदर यांच्यापुढे उभे केले. आरोपीला त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यात आले. तेथील न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आणि १० मिनिटांच्या युक्तिवादानंतर आरोपी रोहित यादवला २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

ती उत्तर प्रदेशची, तो हरियाणाचा२२ वर्षीय आरती यादव ही आचोळे रोडवरील शिर्डीनगर परिसरात परिवारासह राहत होती. ती मूळची उत्तर प्रदेशमधील राहणारी होती, तर आरोपी रोहित यादव हा संतोष भवनच्या कारगीलनगर परिसरात राहत होता. तो मूळचा हरियाणातील राहणारा आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार