शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लेखाधिकाऱ्यांची ३१ ऑक्टोबरला झाली बदली, मग ७ नोव्हेंबरच्या चेकवर सही कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:15 IST

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातून १११ कोटी ६० लाखांचा धनादेश एसबीआय बँकेच्या जव्हार शाखेत पाठविण्यात आला.

हुसेन मेमनजव्हार - ठेकेदारांनी केलेल्या कामांच्या जमा असलेल्या डिपॉझिट रकमेतून तब्बल १११ कोटी ६० लाख रुपये बेकायदा काढण्याचा मोठा कट एसबीआय बँक शाखा, जव्हारच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला. मात्र या घोटाळ्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे समोर आलेले नाही. शिवाय ३१ ऑक्टोबरला बदली झालेल्या अधिकाऱ्याची सही ७ नोव्हेंबरच्या धनादेशावर असल्यामुळे या सर्व प्रकरणात जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त होत आहे. 

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातून १११ कोटी ६० लाखांचा धनादेश एसबीआय बँकेच्या जव्हार शाखेत पाठविण्यात आला. त्यावर लेखाधिकारी म्हणून राकेश रंजन यांची सही आहे, तर कार्यकारी अभियंता नितीन भोये यांचीदेखील सही आहे. त्यामुळे लेखाधिकारी म्हणून सही असलेल्या अधिकाऱ्याची जव्हार बांधकाम विभागातून ३१ ऑक्टोबरला बदली झाल्याचे बोलले जात आहे. जर संबंधित अधिकारी ३१ ऑक्टोबरला या ठिकाणाहून बदलून गेला असेल तर ७ नोव्हेंबरच्या धनादेशावर संबंधित अधिकाऱ्याची सही कशी ? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

खोट्या सह्या केल्या कोणी?कार्यकारी अभियंता नितीन भोये हे या प्रकरणाबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगत आहेत. मग या दोन्ही अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या नेमक्या कोणी केल्या ? हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. काही जाणकारांच्या मते एवढ्या मोठ्या रकमेचा धनादेश अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय कार्यालयाच्या बाहेर जाऊ शकत नाही, असेही सांगण्यात येत आहे. 

ठेकेदारांनी दिला आंदोलनाचा इशाराजेव्हा आम्ही आमच्या कामांच्या डिपॉझिटची बिले काढण्यासाठी जातो, त्यावेळी प्रचंड कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते आणि मोठ्या प्रमाणावर या कार्यालयाच्या पायऱ्यासुद्धा झिजवाव्या लागत असल्याचे काही ठेकेदारांनी सांगितले. १११ कोटींचा घोटाळा करणारे अधिकारी कोण ? याचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे. ठेकेदारांच्या हक्काची रक्कम लुबाडणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही ठेकेदारांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Official Transferred, Then Signed Check? Jawhar Construction Department Scam?

Web Summary : A massive ₹111.6 crore fraud was averted in Jawhar. Questions arise about an official's signature on a check dated after their transfer. Contractors threaten agitation over deposit irregularities.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाfraudधोकेबाजी