शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ‘भावी पंतप्रधान’ म्हणून झळकले बॅनर, काँग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:03 IST

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते.

ठाणे : काही महिन्यांपूर्वी ठाण्यात ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर आता  ठाणे शहरात काँग्रेसने भावी पंतप्रधान म्हणून लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा १९ जूनला वाढदिवस असतो. अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात झळकले आहेत. त्या बॅनरवर राहुल गांधींचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील विविध भागांत राष्ट्रवादी काँग्रेस असो वा काँग्रेस अथवा मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा या उद्देशाने भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर त्यांना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. आता काँग्रेसने देशाचे भावी पंतप्रधान अशी बॅनरबाजी केली. हे बॅनर ठाणे जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेरील सिग्नलवर तसेच मुस रोडवर लावलेले आहेत. या बॅनरमुळे काँग्रेस चर्चेत आली. हे बॅनर काँग्रेस पक्षातील दिवंगत माजी आमदार क्रांती कोळी समर्थक असलेले ठाणे महापालिका शिक्षण मंडळ उपसभापती नंदकुमार मोरे यांनी लावले आहेत.

मोरे यांनी लावलेल्या त्या बॅनरवर ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा उल्लेख करण्यात आला आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्यंतली कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार युवकांचा आवाज, भारताचे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा काढली. काँग्रेस पक्षाचे निर्भीड नेते, भावी पंतप्रधान राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा उल्लेखही ब’नरवर करण्यात आला आहे.  त्यामुळे काँग्रेसने जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेरील सिग्नलवर तसेच मुस रोडवर  लावलेल्या या बॅनरमुळे चांगली चर्चा रंगली आहे. 

काँग्रेस हा सर्वात जुना व सर्वाधिक काळ देशाचे नेतृत्व केलेला पक्ष आहे, राहुल गांधी हे या पक्षाचे नेते आहेत म्हणून या पक्षात भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहणे हा कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोन योग्यच आहे. - सचिन शिंदे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस ठाणे शहर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीthaneठाणे