शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
3
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
4
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
5
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
6
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
7
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
8
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
9
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
10
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
11
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
12
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
13
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
14
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
15
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
16
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
17
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
18
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
19
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
20
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार

हज यात्रेच्या सेवेकऱ्यांना घातला करोडोचा गंडा, ९६८ तरुणांची केली फसवणूक

By कुमार बडदे | Updated: June 23, 2024 20:06 IST

सौदी अरेबियातील मक्का येथे हजयात्रेला जगभरातून प्रत्येकवर्षी मुस्लीम बांधव जात असतात.तेथे नागरी सेवा देण्यासाठी सौदी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असते.

मुंब्राः  हज यात्रा करण्यासाठी मक्का येथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांची गरज भासते. या सेवेकऱ्यांना चांगले मानधन मिळत असल्याने ठराविक कालावधीसाठी  बेरोजगार तरूण मक्केत जात असतात. अशा सेवेकऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालून पसार झालेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण यांनी निवेदनाच्या माध्यमातून  रविवारी मुंब्रा पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षकां कडे केली आहे. 

सौदी अरेबियातील मक्का येथे हजयात्रेला जगभरातून प्रत्येकवर्षी मुस्लीम बांधव जात असतात.तेथे नागरी सेवा देण्यासाठी सौदी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असते. काही एजन्सी त्यांना मनुष्यबळ पुरवत असतात. बंगळुरू येथील एक एजन्सी ही सेवेक-यांना सौदी अरबमध्ये पाठवत असते. त्यासाठी मोबदला म्हणून एजन्सी प्रत्येक तरूणाकडून ६५ हजार रूपये घेते. या एजन्सीचा मुंब्रा येथील दलाल मोहम्मद आदिल आणि त्याचे साथीदार रफत सैय्यद, रोनक परवीन, शेहबाज शाहनवाज सैय्यद, मोहम्मद रफिक, मोहम्मद हनीफ गौडा यांनी व्हिसा, सौदी येथील निवासखर्च यासाठी मुंब्रा येथील सुमारे ३०० तरुणांकडून प्रत्येकी ३५ हजार ते ६५ हजार या प्रमाणे १ कोटी ९५ लाख रूपये उकळले आहेत. तर सबंध महाराष्ट्रातून ९६८ तरुणांकडून ६ कोटी २९ लाख २० हजार रूपये उकळून पोबारा केला असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. ही एजन्सी बंगळुरू येथे असून या एजन्सीने देशभर असा घोटाळा केला असल्याचा संशय व्यक्त करुन,फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी किंवा व्यक्तीगत संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले.   

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसHaj yatraहज यात्रा