शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन वीकमध्ये तब्बल ९६ जोडपी अडकली विवाहबंधनात, व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त हुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 00:08 IST

Valentine's Week : व्हॅलेंटाइन डे, अनोखी तारीख, नववर्ष, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी विवाहेच्छुक जोडपी उत्सुक असतात; परंतु जगभरात कोरोनाचा हाहाकार पसरला आणि मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले.

ठाणे : विवाहाची तारीख संस्मरणीय ठरावी यासाठी विवाहेच्छुक जोडपी अनोख्या तारखेचा विवाह मुहूर्त साधतात. यादिवशी विवाह करण्याची जोडप्यांमध्ये अनोखी क्रेझ असते. फेब्रुवारी महिन्यात असलेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये ठाणे जिल्ह्यातील ९६ जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. मात्र, रविवारी व्हॅलेंटाईन डे आल्याने त्यांचा या दिवशी विवाह करण्याचा मुहूर्त हुकला. या जोडप्यांनी एक दिवसानंतर म्हणजेच माघी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला. या दिवशी सर्वाधिक म्हणजेच तब्बल ६२ जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.व्हॅलेंटाइन डे, अनोखी तारीख, नववर्ष, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी विवाहेच्छुक जोडपी उत्सुक असतात; परंतु जगभरात कोरोनाचा हाहाकार पसरला आणि मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले. मार्च ते मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त अधिक असतात. या लॉकडाऊनमुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. गर्दीवर सरकारने बंदी घातली. कोरोनाचा संसर्ग हळुहळु आटोक्यात येत असल्याने सरकारने केलेल्या अनलॉकनंतर विवाह सोहळे कमी लोकांच्या उपस्थितीत करण्याची अट घातली. त्यामुळे लॉकडाऊन काळात नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची संख्या वाढली. जिल्हा विवाहनोंदणी कार्यालयाने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी कार्यालय सुरू ठेवले होते; परंतु कोरोनाच्या भीतीपोटी एकही नोंदणी झाली नव्हती. मे ते ऑगस्ट २०२० यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील ३५० हून अधिक जोडप्यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ३० जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. व्हॅलेंटाईन डेलादेखील विवाह करण्याची जोडप्यांमध्ये क्रेझ आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. ७ फेब्रुवारी आणि त्यानंतर १४ फेब्रुवारीलाही रविवार आल्याने, तसेच १३ तारखेला शनिवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने ८ ते १२ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन वीकमध्ये ९६ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. तारिखनिहाय आकडेवारी पाहता ८ फेब्रुवारी रोजी २२, ९ फेब्रुवारी रोजी १५, १० फेब्रुवारी रोजी ९, ११ फेब्रुवारी रोजी ११, १२ फेब्रुवारी रोजी ३९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले. त्यानंतर सोमवारी माघी गणेशोत्सवाच्या दिवशी ६२ जोडप्यांनी विवाहासाठी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केल्याची माहिती या कार्यालयातील सूत्रांनी दिली. 

रविवारी व्हॅलेंटाईन डे आल्याने या दिवशी विवाह नोंदणी कार्यालयात येऊन जोडप्यांना विवाह करता आला नाही. त्यामुळे सोमवारी त्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे १५ ते २० जोडपी सध्या विवाहासाठी येत आहेत. सोमवारी मात्र संख्या जास्त होती.- अनिल यादव, विवाह नोंदणी अधिकारी, जिल्हा विवाह नोंदणी कार्यालय

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे