शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील पाणी समस्या मिटली; भातसासह बारवी धरणात ९० टक्के पाणी साठा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गांवखेड्यातही पाऊस पडला नाही. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गांवखेड्यातही पाऊस पडला नाही. मात्र आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणी साठा वाढला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के व बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. यामुळे वर्षे भराची पाणी समस्या आता मिटली आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणात काही अंशी पाणी साठा कमी झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या ‌वर्षी ९०.२० टक्के साठा होता. पण यंदा हा साठा ८९.९६ टक्के आहे. बारवी धरणात अवघा १८६९ मिमी पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आजपर्यंत २६२३ मिमी पाऊस पडला आहे. कान्होळला २००१मिमी, पाटगांवला १९२२मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मिमी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८९.९६ टक्के झाला आहे.

या बारवी धरणाची आजची पाणी पातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात आज रोजी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दश लक्षघनमीटर पाणी साठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही गेल्या वर्षापेक्षा आज रोजी कमी साठा आहे. गेल्यावर्षी भातसात ९५.३७ टक्के साठा होता. यंदा तो ९०.१३ टक्के आहे.या भातसा व बारवी धरणाच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आजरोजी जास्त पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणी साठा यंदा ६८.५६ टक्के तयार झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेDamधरण