शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

९० टक्के प्रश्न अनुत्तरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:25 IST

बुलेट ट्रेनमुळे बाधित होणाऱ्या कांदळवन व पक्ष्यांची किती भरपाई देणार, बाधित होणारे ३४ तलाव अन्यत्र कुठे पुनरुज्जीवित

ठाणे : बुलेट ट्रेनमुळे बाधित होणाऱ्या कांदळवन व पक्ष्यांची किती भरपाई देणार, बाधित होणारे ३४ तलाव अन्यत्र कुठे पुनरुज्जीवित करणार, गुजरात व महाराष्ट्रातील शेतकºयांना वेगवेगळा मोबदला का, जमिनीचा पाचपट मोबदला दुपटीवर कसा घसरला, बुलेट ट्रेन अहमदाबादला नव्हे दिल्लीला घेऊन जा, या व अशा एक ना अनेक प्रश्नांनी प्रकल्प अधिकारी आर.पी. सिंह यांना चक्रावून टाकले. तुमच्या ९० टक्के प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, अशी कबुली देत सिंह यांनी ठाणेकरांपुढे हात टेकले.बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय परिणामांबाबत माहिती देण्याकरिता आयोजित जनसुनावणीत मनधरणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुलेट ट्रेनच्या संदर्भात मंगळवारी गडकरी रंगायतनमध्ये पर्यावरणीय जनसल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, या बैठकीत शेतकरी काय प्रश्न विचारणार, याचा अंदाज कदाचित न आल्याने अधिकारी प्रश्नांनी चक्रावून गेले. या बैठकीला बुलेट ट्रेनचे मुख्य प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी, पर्यावरणाचे गाढे अभ्यासक आदींसह इतर विभागांचे तज्ज्ञ व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी येणाºया प्रत्येक नागरिकाच्या हाती सात ते आठ पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता. नागरिकांच्या हाती देण्यात आलेला अहवाल आणि प्रशासनाचे सादरीकरण यामध्ये तफावत असल्याने शेतकरी व पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला.यावेळी विचारले गेलेले काही अडचणीचे प्रश्नही जनसुनावणी आहे की, सल्लामसलत आहे. कार्यक्रमाला आल्यावर हा अहवाल का देण्यात आला. यापूर्वी तो देणे अपेक्षित होते. त्यामुळे आमची मते हवी असतील, तर आम्हाला महिनाभराचा अवधी द्या. पक्षी, पर्यावरण, कांदळवन आणि शेतकºयांना किती मोबदला दिला जाणार, याचा उल्लेख कुठेही नाही. हा अहवाल केवळ नेटवरील माहितीवरून बनवण्यात आला आहे. नदीचे पात्र विस्कळीत होणार आहे. त्यामुळे संभावित धोक्याची कोणतीही माहिती अहवालात देण्यात आलेली नाही. बोगदे काढल्याने जनजीवन विस्कळीत होणार आहे. त्याचाही उल्लेख नाही.- अ‍ॅड. भारद्वाज चौधरी, नागरिकजपानच्या जायका यांनी जे काही नियम केले आहेत, त्यांचा उल्लेख न करून या अहवालात त्यांनाही बगल देण्यात आली आहे. नियम चुकीचे तयार करण्यात आले आहेत.-शार्दुल मनोरकर, नागरिकअपूर्ण माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. कांदळवनाचे संवर्धन, शेतकरी, पर्यावरणाची हानी याबाबत स्पष्ट उल्लेख करणे टाळले आहे. शेतकºयांचा कोणत्याही प्रकारे उल्लेख करण्यात आलेला नाही.- संतोष केणे, स्थानिक नागरिकप्रकल्पाचे सामाजिक परिणाम होणार आहेत, परंतु ते कसे होणार, याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. ३४ तलाव बाधित होणार आहेत, परंतु त्यांचे पुनरुज्जीवन कसे केले जाणार? हे तलाव कोणत्या गावातील आहेत, लोकेशन काय आहे, याचाही उल्लेख अहवालात टाळण्यात आला आहे. नद्यांचा प्रवाह बदलला जाणार आहे. बाहेरचे मजूर येथे येणार असल्याने स्थानिकांबरोबर संघर्ष अटळ आहे. ठाणे किंवा इतर महापालिकांना कचरा, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी अद्याप तोडगा काढता आलेला नसताना तुम्ही कोणत्या पद्धतीने कचरा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणार, याचा उल्लेख नाही. मातीचा कस लयाला जाणार आहे, तो कसा भरून काढणार.- मयूरेश भडसावळे, जागरूक नागरिकप्रकल्पाचे सर्व्हे करताना शेतकºयांना नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत. गुजरातच्या शेतकºयांना जादा मोबदला आणि येथील शेतकºयांना कमी मोबदला, असा दुजाभाव कशासाठी-हिरा पाटील, स्थानिक नगरसेवक, राष्टÑवादी काँग्रेसआधी जमिनीचा पाचपट मोबदला दिला जाईल, असे सांगितले गेले. आता मोबदला दुपटीवर कसा आला, शेतकºयांना विश्वासात का घेतले जात नाही.- बाबाजी पाटील, स्थानिकनगरसेवक, राष्टÑवादी काँग्रेस