शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१०वी उत्तीर्ण झालेल्या ९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप तर ३०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 20:04 IST

पालिका शाळेतील ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख देऊन त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला आहे.

मीरारोड - मीरा-भाईंदर शहरात राहणा-या तसेच शहरातील शाळेत शिकणाराया उच्च गुणांनी उत्तीर्ण १० वीच्या ९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप , ३०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू तर पालिका शाळेतील ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख देऊन त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला आहे. लॅपटॉप, भेटवस्तूसह एकूणच कार्यक्रमाचा मिळून सुमारे ९ लाखांचा खर्च होणार आहे.महिला बालकल्याण समितीची नुकतीच बैठक झाली. सदर बैठकीत शहरातून १० वीच्या परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणा-या महाराष्ट्र राज्य बोर्ड, आयसीईएस व सीबीएससी बोर्डातील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावानुसार एका लॅपटॉपची किंमत ४० हजार रुपयांच्या घरात असल्याचे नमूद आहे.या शिवाय ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ३०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी बाराशे रुपये किमतीची बॅग वा भेटवस्तू दिली जाणार आहे. समितीच्या वतीने केवळ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला जायचा. पण यंदापासून महापालिका शाळांमधून ८ वी उत्तीर्ण होऊन दुस-या शाळेत ९ वी मध्ये प्रवेश घेणा-या ३ विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार, १३ हजार व ११ हजार रुपयांची रक्कम देऊन त्यांचे देखील कौतुक करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक दिले जणार आहे.समिती सभापती दीपिका अरोरा, उपसभापती वंदना भावसार, प्रभाग समिती सभापती विणा भोईर, अर्चना कदम, हेतल परमार, गीता परदेशी, कुसुम गुप्ता आदी समिती सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. या आधी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. समितीच्या वतीने दिल्या जाणा-या लॅपटॉप, भेट वस्तू लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून दिल्या जाणार आहेत. नाव नोंदवण्यासाठी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणा-या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी प्रभागातील स्थानिक नगरसेवक किंवा महापालिका मुख्यालयातील महिला बाल कल्याण समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे पालिकेकडून सांगण्यात आले.